मगोचे आमदार सुदीन ढवळीकरांनी सुरुवातीला मांडलेली याचिका घेतली मागे

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

ढवळीकर यांनी आपण सुरुवातीला सादर केलेले याचिका मागे घेत असल्याचे निवेदन सभापतींना दिले.

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून भाजपमध्ये गेलेले  आमदार आजगावकर आणि दीपक प्रभू पाऊसकर यांच्याविरुद्धच्या अपात्रता याचिकेवरील निर्णय आज झालेला नाही. याचिकादार  मगोचे  नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी या दोन्ही आमदारांनी विरुद्ध दोन अपात्रता याचिका सभापतींसमोर सादर केल्या होत्या. त्यापैकी कोणती याचिका ते मागे घेऊ इच्छित आहेत अशी विचारणा सभापतींनी त्यांना केली.

लोकायुक्त निवडप्रकरणी पूर्ण अधिकार दिल्यासच संमती: दिगंबर कामत

त्यावर ढवळीकर यांनी आपण सुरुवातीला सादर केलेले याचिका मागे घेत असल्याचे निवेदन सभापतींना दिले. त्यानंतर सभापतींनी निवाड्च्या वेळी आपणास पुन्हा बोलावण्यात येईल असे आजचे कामकाज पूर्ण केले.यामुळे अपात्रता प्रकरणी आज निकाल जाहीर होणार की नाही या उत्सुकतेवर पडदा       पडला.

संबंधित बातम्या