जादूगार शिरीष कुमार यांचा कला भूषण पुरस्काराने सन्मान

वार्ताहर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

नवेवाडे वास्कोतील जादूगार शिरीष कुमार यांचा पुणे येथील एका कार्यक्रमात जादू कला भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

दाबोळी: नवेवाडे वास्कोतील जादूगार शिरीष कुमार यांचा पुणे येथील एका कार्यक्रमात जादू कला भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

मर्लिन पुरस्कार विजेती जादूगार अक्षया हिचा जादू प्रशिक्षण कार्यक्रम पुणे महाराष्ट्र येथील होटेल कोहिनूर एक्झिक्युटिवमध्ये आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा, हैद्राबाद, केरळ येथील सुमारे दीडशे जादूगार सहभागी झाले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात जादूच्या प्रयोगाचे सादरीकरण कसे करावे, स्टेज मॅनेजमेंट कसे असावे, वेशभूषा कशी असावी याविषयी अक्षया हिने सखोल मार्गदर्शन करून उपस्थित जादू कलाकारांना प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यावेळी वास्कोतील जादूगार शिरीष कुमार यांना जादू कला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन प्रियांका सरोदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरोदे मॅजिक शॉपचे मालक जादूगार प्रथमेश यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित बातम्या