मगोचे आमदार सुदिन ढवळीकर वकिलांसह विधानसभा संकुलात दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी तातडीने पत्र पाठवून बोलल्यामुळे मगोचे आमदार सुदिन ढवळीकर आपल्या वकिलांसह विधानसभा संकुलात आता दाखल झाले आहेत.

पणजी: गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी तातडीने पत्र पाठवून बोलल्यामुळे मगोचे आमदार सुदिन ढवळीकर आपल्या वकिलांसह विधानसभा संकुलात आता दाखल झाले आहेत. ढवळीकर यांनी मगो मधून भाजपमध्ये गेले आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक प्रभू पाऊसकर यांच्या विरोधात अपात्रता याचिका सभापतींसमोर समोर सादर केली आहे.

सासष्‍टीत अठरा महिन्‍यांत नऊ खून 

त्या याचिकेवर अंतिम सुनावणी होऊन सभापतींनी निकाल राखीव ठेवला आहे. सभापतींनी ढवळीकर यांना तातडीने बोलावल्याने ते आज या याचिकेवर निकाल देतील अशी चर्चा आहे. ढवळीकर  मटका हे आपले वकील धवल झवेरी यांच्यासह विधानसभा संकुलात दाखल झाले आहेत. जाताना त्यांनी सभापतींनी आपल्याला तातडीने बैठकीसाठी बोलावले आहे एवढेच पत्रकारांना सांगितले.

गोव्यातील खाण प्रकरणाची सुनावणी तूर्त लांबली! खाणी सुरू होण्याची शक्यता अंधूक 

संबंधित बातम्या