Mahadayi Water Dispute : रिव्हॉल्युशनरी गोवन्स वगळता विरोधक एकवटले; विर्डीत होणार म्हादई बचावचा एल्गार

कर्नाटक राज्याच्या सीमेवरील कणकुंबीवासीयांचाही गोेव्याला पाठिंबा
Goa Political parties
Goa Political parties Dainik Gomantak

Mahadayi Water Dispute : साखळी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या म्हादई बचाव मेळाव्यासाठी रिव्हॉल्युशनरी गोवन्स वगळता इतर राजकीय पक्ष एकत्र आले असून त्यांनी जोरदार जनजागृती केली आहे. आज पणजी येथे सर्व पक्षांच्या अध्यक्षांनी म्हादईचा लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. कॉंग्रेस, गोेवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल, आप, आणि शिवसेना या पक्षांचे अध्यक्ष या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले.

Goa Political parties
Mormugao Crime : धक्कादायक ! 24 वर्षीय युवकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

‘मुख्यमंत्र्यांनी साखळीतील सभेसाठी कितीही आडकाठी आणली, तरीही आमचे ऐक्य आम्ही अबाधित राखू, सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे सरकारी दडपशाहीचा मुकाबला करू.’ असा निर्धार राजकीय पक्षांच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि गोेवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांच्यासह इतरांचीही पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.

साखळी येथे मैदानावर सोमवारी जाहीर सभा घेण्यास पालिका मंडळाने मान्यता दिली होती. परंतु सरकारी दबावामुळे मुख्याधिकाऱ्यांनी मान्यता मागे घेतली. आता विर्डी येथे एका खासगी मैदानावर ही सभा घेण्यात येत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना ऐनवेळी खूप धावपळ करावी लागली. आता सर्व मान्यता त्यांच्या पदरात पडल्या आहेत. सरकार दडपशाही करू पाहते, तेव्हा आमचा निर्धार आणखी पक्का होतो, अशी माहिती या वक्त्यांनी यावेळी दिली.

Goa Political parties
Olive Ridley Turtle: कासव आले खरे पण अंडी न घालताच माघारी परतले; विश्वजीत राणेंनी दिला गंभीर ईशारा

कणकुंबीवासीयांचाही गोेव्याला पाठिंबा

कर्नाटक राज्याच्या सीमेवरील कणकुंबी येथील लोकांनीही गोव्याच्या म्हादई आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कर्नाटकने धरण बांधून कणकुंबीवर अन्याय केला आहे. आमचे पाणी हिरावून ते राज्याच्या अन्य भागांना देण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. या धरणाचा परिणाम या संपूर्ण परिसरावर होईल, असे सांगून कणकुंबीतील नागरिकांचे गट गोेव्याच्या लढ्याला पाठिंबा देत आहेत. कणकुंबीचे त्रस्त नागरिक कर्नाटकबरोबर पाण्याच्या प्रश्‍नावर लढण्यास सज्ज झाले असून आम्हाला कर्नाटकात राहायचे नाही. हा भाग गोव्याला जोडून टाका, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’मध्ये फूट

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षात म्हादई प्रश्‍नावरून फूट पडली आहे. पक्षाच्या एका गटाने अध्यक्ष मनोज परब यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत राजीनामा दिला. मनोज परब यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हादई प्रश्‍नावर उद्या पिसुर्ले येथे जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले. गोव्यतील राजकीय पक्षांपेक्षा आमची विचारधारा वेगळी असल्याने आम्ही वेगळा मार्ग अनुसरत आहोत, असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्यावर इतर राजकीय पक्षांनी कठोर टीका करत ‘आरजी’ हा भाजपच्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com