Save Mahadayi : राज्यभरात दीप जागोर; ‘सेव्ह म्हादई’ चळवळीच्या आवाहनाला प्रतिसाद

राज्याची जीवनदायिनी म्हादई नदीचे पाणी वळवू देणार नाही, या निर्धाराने उभारलेल्या सेव्ह म्हादई चळवळीच्या वतीने जाहीर केलेल्या म्हादई पूजन आणि दीप जागोरला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Save Mahadayi
Save MahadayiDainik Gomantak

Save Mahadayi: राज्याची जीवनदायिनी म्हादई नदीचे पाणी वळवू देणार नाही, या निर्धाराने उभारलेल्या सेव्ह म्हादई चळवळीच्या वतीने जाहीर केलेल्या म्हादई पूजन आणि दीप जागोरला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दीपपूजनाचे सर्वधर्मीय प्रातिनिधीक पूजा पणजी येथे पार पडली.

Save Mahadayi
Mahadayi Water Dispute: म्हादईसाठी पेडणेत घरोघरी कलश पूजन

म्हादईचे पाणी कोणत्याही स्वरूपात वळवू देणार नाही, यासाठी उभारलेल्या ‘सेव्ह म्हादई’ चळवळीने विविध आंदोलने सुरू केली आहेत. चळवळीने या अगोदर जाहीर केल्याप्रमाणे आज मातीसाठी दीप पूजन करण्यात आले.

यात गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. याच आंदोलनाचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणून पणजीत बोक द वॉक येथे सर्वधर्मीय पूजन करण्यात आले. यावेळी दीप, मेणबत्ती आणि अगरबत्ती लावून सरकारला जागे करण्याबरोबर म्हादईचा नैसर्गिक स्त्रोत वाहूपान देण्यासाठी कर्नाटकाला सुबुद्धी मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी प्रा. प्रज्जल साखरदांडे, महेश म्हांबरे, तनूज अडवलपालकर, सरफराज खान, मारियानो फेराव, शायनी गोम्स, जॅक सुकेजा, जॉयल आंद्रे, परपेच्युल फेराव, आकाश साळगावकर आदी उपस्थित होते.

आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रतिमा कुतीन्हो यांनी पणजी येथे मांडवी किनारी मेणबत्ती पेटवली. ‘या सरकारने मंडवीचा सौदा करताना सर्व गोवेकरांना काळोखात ठेवले. म्हादईचा घात करणाऱ्याच्या डोक्यात उजेड पडावा, यासाठी हे आंदोलन आहे’, असे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com