Mahadayi Bachao Protest : विर्डीतील जाहीर सभेला गर्दी, जिज्ञासा आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विर्डीतील जाहीर सभेला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहता आयोजकांमध्ये वेगळीच स्फूर्ती दिसून येत होती.
Mahadayi Bachao Protest | Mahadayi Water Dispute
Mahadayi Bachao Protest | Mahadayi Water DisputeDainik Gomantak

Mahadayi Bachao Protest : विर्डीतील जाहीर सभेला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहता आयोजकांमध्ये वेगळीच स्फूर्ती दिसून येत होती. या सभेस चाळीसही आमदारांना खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. परंतु इतर सत्ताधारी आमदार व आरजीचे विरेश बोरकरही आलेच नाहीत. ते गैरहजर राहिले. (Mahadayi Water Dispute)

Mahadayi Bachao Protest | Mahadayi Water Dispute
KTC: बेकायदेशीर दुकानाबाबत वाहतूक विभागास पत्र

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई, कार्लोस फेरेरा, एल्टन डिकॉस्‍टा उपस्थित होते. प्रा. सुभाष वेलिंगकर, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, प्रजल साखरदांडे, दामोदर मावजो, हृदयनाथ शिरोडकर, दत्ता नायक, सुनीता वेरेकर व इतर मान्‍यवरही व्यासपीठावर होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, राष्ट्रवादीचे जुझे फिलिप डिसोझा, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप उपस्थित होते. याशिवाय युवा वर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

‘म्हादई ’ या शब्दातच आई : आझाद

या सभेस भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी खासदार कीर्ती आझाद उपस्थित होते. त्यांनीही सभेत आपले विचार व्यक्त केले. म्हादई या शब्दातच आई आहे, असे ते म्हणाले. पाणी ही प्रत्येक प्राणिमात्रांची गरज आहे.

पाणी आपला धर्म विसरले तर काय स्थिती होईल याची कल्पना करा असे सांगून पर्यटनासाठी प्रिय असलेल्या सुंदर अशा गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्‍‍यक आहे, असे आझाद म्‍हणाले.

प्रशांत नाईक यांच्‍यावर प्रहार

शंकर पोळजी म्‍हणाले, येथील वक्ते हे राजकीय नाहीत, येथील कोणालाही निवडणुका लढवायच्‍या नाहीत. वास्‍तविक प्रशांत हे गोवा फॉरवर्डचे नेते असून काणकोणमधून निवडणूक लढविण्‍याची त्‍यांची सुप्‍त इच्‍छा आहे.

यावेळी पोळजी यांच्‍या वक्तव्‍यानंतर त्‍यांचा चेहरा पाहण्‍यालायक झाला होता. परस्‍पर त्‍यांचे तिकीट कापले गेले, अशा प्रतिक्रियाही उमटल्‍या.

सर्वजण म्हादईसाठी आले!

विर्डी येथे ''सेव्ह म्हादई मंच''ची सभा पार पडली. यात अनेक पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, विद्यमान आमदार आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली. या सभेसाठी परप्रांतीयांना पैसे देऊन गोळा केल्याचा आरोप केला जात आहे.

याबाबत ‘टुगेदर फॉर साखळी’ गटाचे नगरसेवक राजेश सावळ म्हणाले, आरोप चुकीचा असून सर्वजण म्हादईच्या रक्षणासाठी स्वच्छेने एकत्र आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com