
Goa: म्हादईप्रश्नी राज्यातील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सत्ताधारी भाजपनेही आता आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात पंचायत आणि पालिकांनी ठराव घेऊन तो पंतप्रधान कार्यालयाला ई-मेलद्वारे पाठवावा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले आहे.
सरचिटणीस दामू नाईक आणि ॲड. नरेंद्र सावईकर यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तानावडे बोलत होते.
तानावडे म्हणाले की, जल आयोगाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठीच आता केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी राज्यातील जनतेच्या सह्यांची मोहीम राबवून ती केंद्राला सादर करण्यात येईल.
याबरोबरच या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व पालिका आणि पंचायतींमधून ठराव घेऊन तेही केंद्र सरकारला पाठवण्यात येतील. या संदर्भात भाजपने घेतलेल्या ठरावाची प्रत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवण्यात आली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. केंद्रीय जल आयोगाने दिलेली मंजुरी तातडीने मागे घ्यावी आणि पाणी व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करावे, असा प्रस्ताव भाजपच्या गोवा शाखेने मंजूर केला आहे.
हा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.