Mahadayi Water Dispute: म्हादई आणि कोळसा लॉबी यांचा एकमेकांशी थेट संबंध

म्हादईचे पाणी वळविलेल्‍या मलप्रभेच्या खोऱ्यातच कंपन्यांचे पोलाद कारखाने उभे होत आहेत, असा आरोप अभिजित प्रभुदेसाई यांनी केला.
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

Mahadayi Water Dispute: म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविणे आणि गोव्यात कोळसा हाताळणीत वाढ करणे या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. जिंदाल,अदानीसारख्या पुंजीपतींचा फायदा होणे हाच त्यामागचा खरा हेतू आहे, असा आरोप काल येथे पर्यावरणप्रेमी, आंदोलकांनी घेतलेल्या बैठकीत केला.

या दोन्ही प्रकरणांवर ग्रामपातळीवर जाऊन लोकजागृती करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

म्हादईचे पाणी वळविलेल्‍या मलप्रभेच्या खोऱ्यातच वरील कंपन्यांचे पोलाद कारखाने उभे होत आहेत. हे वाढीव पाणी याच कारखान्यांसाठी वापरले जाणार आहे, असा आरोप अभिजित प्रभुदेसाई यांनी केला.

Mahadayi Water Dispute
Food Processing Industry: ...तर अन्नप्रक्रिया उद्योग संकटात येण्‍याची भीती!

30 रोजी ठरणार आंदोलनाची दिशा

26 जानेवारी रोजी गावागावांत होणाऱ्या खास ग्रामसभांमधून दोन्ही प्रस्तावांना विरोध करण्याचा ठराव घेण्यात येईल. तसेच 30 रोजी मुरगाव बंदराबाहेर कार्यकर्ते निदर्शने करतील, असे कोळसाविरोधी आंदोलनातील नेते अभिजित प्रभुदेसाई म्‍हणाले.

याच दिवशी सायंकाळी मडगाव येथील कोकणी भवनमध्ये ‘म्हादई बचाव’ मंचची एक बैठक होणार आहे. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असेही त्‍यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com