Mahadayi Water Dispute: म्हादई नदीचे अस्तित्व जनतेच्या लढ्यावरच अवलंबून

म्हादईनदीबाबत सत्तरी तालुक्यातील नागरिकांनी मोठा लोकलढा उभा केला पाहिजे. म्हादईचे अस्तित्व लोक लढ्यावरच अवलंबून आहे, असे प्रतिपादन किशोर नाईक गावकर यांनी केले.
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak

Mahadayi Water Dispute: म्हादई नदीवर मोठे संकट निर्माण झालेले आहे. तरीही सत्तरीतील जनता गप्प आहे. म्हादईनदीबाबत सत्तरी तालुक्यातील नागरिकांनी मोठा लोकलढा उभा केला पाहिजे. ती गरजच आहे. म्हादईचे अस्तित्व लोक लढ्यावरच अवलंबून आहे, असे प्रतिपादन किशोर नाईक गावकर यांनी केले.

वाळपई मासोर्डे येथील शांतादुर्गा कला मंच, कला व सांस्कृतिक खाते गोवा सरकार, नेहरू युवा केंद्र पणजी व सम्राट क्लब वाळपई यांच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या म्हादय मांड महोत्सव समारोप सत्रात गुरुवारी 26 रोजी रात्री गावकर बोलत होते.

Mahadayi Water Dispute
Panjim Municipality: ...यामुळे सत्ताधारी नगरसेवकांना प्रश्‍न मांडणेही भीतीचे

नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक कालीदास घाटवळ, नगरसेविक प्रसन्ना गावस, झिलू गावकर, अंकुश धुरी, ज्येष्ठ नागरिक पुंडलिक गावस, देवस्थानचे पुजारी राजेंद्र गावस, शांतादुर्गा कला मंच संस्थेचे सचीव चंदन गावस, अध्यक्ष रमेश गावस, कार्यक्रमाचे प्रमुख गौरीश गावस, कृष्णा गावस यांची उपस्थिती होती.

नेहरू युवा केंद्राचे कालिदास घाटवळ म्हणाले, लोककला महोत्सव नवीन पिढीसाठी गरेजाच आहे. नवीन पिढीला लोककला समजली पाहिजे. तरुणांनी या लोककलेच्या संवर्धनाच्या बाबतीत पाऊल उचलले पाहिजे.

नवीन पिढीसमोर आदर्श निर्माण करण्याचे क्षमता आजच्या ज्येष्ठ पिढीने दाखविणे गरजेचे आहे. शांतादुर्गा कला मंच चांगल्या प्रकारचे कार्य करीत आहे.

Mahadayi Water Dispute
Goa Tourists : गोव्याच्या स्वच्छतेसाठी सरसावले पर्यटक

नगरसेविका प्रसन्न गावस यांनी विचार मांडले. या लोककला महोत्सवामध्ये दोन कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये पारंपरिक लोककलेच्या संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या पौर्णिमा राजेंद्र केरकर व पत्रकार नाट्य लेखक विठ्ठल पारवडकर यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विठ्ठल पारवाडकर, पौर्णिमा केरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com