Mahadev Tali
Mahadev Tali Tukaram Sawant

Bicholim News : पिळगावमधील महादेवाच्या तळीला मिळणार नवा साज

जलस्रोत खात्यातर्फे सुमारे 25 लाख रुपयांचा निधी

नैसर्गिक जलस्रोत आणि धार्मिक महत्त्व असलेल्या पिळगावमधील देवाच्या पुरातन तळीला आता नवा साज मिळणार आहे. श्री महादेव मंदिरासमोरील या तळीचा विकास करण्यात येणार असून, हे कामही हाती घेण्यात आले आहे. जलस्रोत खात्यातर्फे सुमारे 25 लाख रुपये खर्चून या तळीच्या सौंदर्यीकरणाबरोबरच मंदिराजवळील कुंपणाचेही बांधकाम करण्यात येणार आहे.

आयडियल हायस्कूल आणि श्री महादेव मंदिराच्या मधोमध असलेली ही तळी ‘महादेव देवाची तळी’ म्हणून ओळखण्यात येत आहे. ही तळी शेतकऱ्यांसाठीही वरदान आहे. पुरातन आणि जीर्णावस्थेतील या तळीची अलीकडच्या काही वर्षांपासून काही प्रमाणात दुरवस्था झाली होती.

Mahadev Tali
Goa Jungle Juice : दारूभट्ट्यांवरील धडधड थांबली; काजू हंगाम संपला

धार्मिक महत्त्व असलेल्या या तळीचे संवर्धन व्हावे, यासाठी आमदार प्रेमेंद्र शेट यांनी पुढाकार घेतला आहे. देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक पंचसदस्यांसमवेत पाहणी केल्यानंतर आमदार शेट यांनी या तळीच्या विकासाचा प्रस्ताव तयार करून जलस्रोत खात्याला सादर केला. या प्रस्तावांतर्गत या तळीच्या विकासाचे काम मार्गी लागले आहे.

नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन होणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच पिळगावमधील तळीच्या विकासाचा प्रस्ताव पुढे आला. या तळीला आता वैभव प्राप्त होणार आहे. तळीचा विकास झाल्यानंतर या तळीचे धार्मिक महत्त्व अबाधित राहतानाच शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे.

प्रेमेंद्र शेट, आमदार, मये

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com