Shri ShantaDurga: सातेरी शांतादुर्गा देवीचा आजपासून महाजत्रोत्सव

या काळात विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्‍यात येणार आहे
Shri ShantaDurga
Shri ShantaDurgaDainik Gomantak

शेल्डे-केपे येथील श्री सातेरी शांतादुर्गा देवस्थानचा महाजत्रोत्सव दि. 30 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्‍यात येणार आहे. त्‍यानिमित्त उद्या सोमवारी पहिल्‍या दिवशी सकाळी धार्मिक विधी, जल्‍मी मठातून मंगलकलशाचे मंदिरात आगमन, देवीच्या चरणी स्थापना, सकाळी 11.30 वाजता ज्‍येष्ठ महजनांकडून महाजत्रोत्सवाचा उद्‌घाटन सोहळा,

आरती, तीर्थप्रसाद, संध्याकाळी 4 वाजता मंगलकलशाची मठ येथील पाचापुरुष मठात महापूजा, नंतर देवीच्या मंदिरात पुन्हा आगमन,6.30 वाजता श्री चरणी सामूहिक प्रार्थना (गाऱ्हाणी), अवसर, जल्‍मी अवसराचे काऱ्याच्या वृक्षाखाली नारळ ओवाळून फांदी आणणे, तिचे विधिवत पूजन, अवसराचे विसर्जन, पुराण, आरती, श्री सातेरी शांतादुर्गा देवीची पालखीतून मिरवणूक व प्रसाद झाल्यावर भोवर विधी, जागर होईल.

दि. 31 रोजी सकाळी धार्मिक विधी, संध्‍याकाळी पालखी मिरवणूक, रात्री 9 वाजता वेशभूषा कार्यक्रम होईल. दि.1 फेब्रुवारी रोजी सकाळी धार्मिक विधी, संध्‍याकाळी 7.30 वाजता पालखी मिरवणूक, रात्री 9 वाजता ‘शिता थंय भुता’ हा नाट्यप्रयोग. दि. 2 रोजी सकाळी धार्मिक विधी, संध्‍याकाळी पालखी मिरवणूक, रात्री ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हा नाट्यप्रयोग.

दि. 3 रोजी सकाळी धार्मिक विधी, संध्‍याकाळी 7.30 वाजता पालखी मिरवणूक, रात्री 9 वाजता तबला आणि सुवारीवादन व नंतर जागर होईल. दि. 4रोजी सकाळी धार्मिक विधी, संध्‍याकाळी 7.30 वाजता पालखी मिरवणूक, रात्री 9 वाजता अखिल गोवा नृत्य स्पर्धा होणार आहे.

दि.5 रोजी सकाळी धार्मिक विधी, संध्‍याकाळी 7.30 वाजता पालखी मिरवणूक, रात्री 9 वाजता हास्यसम्राट मनोहर भिंगी यांचा कार्यक्रम होणार आहे.दि. 6 रोजी सकाळी धार्मिक विधी, संध्‍याकाळी 7.30 वाजता पालखी मिरवणूक, रात्री 9वाजता ‘घोव आकवार, बायला सावार’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.

दि7 रोजी सकाळी देवीची महापूजा, संध्‍याकाळी7.30 वाजता पालखी मिरवणूक व रात्री 9 वाजता ‘व्यंकोजी वाघ’ हा नाट्यप्रयोग होईल.

9फेब्रुवारीला ऑर्केस्‍ट्रा, दिवजोत्सव

दि. 9 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी आरती, प्रसाद, संध्‍याकाळी 7.30 वाजता पालखी मिरवणूक, रात्री ९ वाजता ऑर्केस्‍ट्रा व जागर तर पहाटे 3.30 वाजता दिवजोत्सव साजरा होणार आहे. दि. 10 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी आरती, प्रसाद, संध्‍याकाळी 7.30 वाजता पालखी मिरवणूक, प्रसाद, महाजागर होऊन म्हारंगणात दीड सवंगाचा जागराने बारा जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. दि. 11 रोजी सकाळी 7 वाजता मंदिरातील मंगलकलशाचे गावातील महाजनांच्या घरोघरी आगमन, पूजन, संध्याकाळी 4 वाजता श्रींच्या मंदिरात मंगलकलश, विसर्जन व आशीर्वाद सोहळा होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com