पणजीतील महालक्ष्मी मंदिर पुन्हा बंद 

goa mahalakshmi temple.jpg
goa mahalakshmi temple.jpg

पणजी:  राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने नाइट कर्फ्यूसह अनेक निर्बंध लादले आहेत. त्यानंतर आता कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राजधानी पणजीतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर बंद करण्याचा निर्णय मंदिराच्या व्यवस्थापकीय समितीने घेतला आहे. कोरोनाच्या संकटामुळे वर्षभरापासून देशभरातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती.  त्यानंतर यावर्षी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मंदिर समितीने मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (Mahalakshmi temple in Panaji closed again) 

कोरोना रुग्णांसाठी राज्यात अत्याधुनिक दोन हजार खाटा उपलब्ध करून देणार:  ...
 
दारम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर गेल्यावर्षी जुलै महिन्यात भाविकांच्या आग्रहामुळे महालक्ष्मीच्या मंदिराची कवाडे खुली करण्यात आली होती. मात्र, यावर्षी कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने मंदिर प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत पुन्हा एकदा मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मंदिराच्या व्यवस्थापकीय समितीने महालक्ष्मीचे मंदिर बंद करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या कलम 144 अंतर्गत मंदिर व्यवस्थापनाने मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर, राज्यावरील कोरोनाचे संकट जाण्यासाठी, सर्व गोमंतकीयांनी पुढील काही दिवस सामाजिक अंतर पाळणे, मास्क लावणे, आणि गर्दी टाळणे यांसारख्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. 

पणजीतील हे महालक्ष्मी मंदिर सन 1818 मध्ये स्थापन झाले. मात्र जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर मंदिर प्रशासनाने मंदिर बंद केले आहे. याशिवाय ममंदिरातील पूजऱ्यांनी भविकांशिवाय मंदिरातील पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. 


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com