महालवाडा,पैंगीण पंचायतीची निवडणूक बिनविरोध

महालवाडा वार्डातून एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सुनील पैंगणकर यांचे चित्र स्पष्ट
Election
ElectionDainik Gomantak

पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात राजकिय वातावरण चांगलेच तापले असताना पैंगीण पंचायतीच्या महालवाडा येथे मात्र थोडी वेगळी स्थिती आहे. कारण या वार्डातून सुनील पैंगणकर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरूद्ध एकही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

(Mahalwada Poinguinim, Panchayat elections likely to be unopposed )

Election
गोवा सरकारचा मोठा निर्णय! ईलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना 31 जुलैपासून बंद होणार

मात्र अधिकृत घोषणा निर्वाचन अधिकारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करणार आहेत. आता पर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार काणकोण मधील सात पंचायतीच्या 59 वार्डातून पैंगीण पंचायतीच्या महालवाडा वार्डाणतून पैंगणकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.

Election
Goa Tourism : बेकायदा पर्यटनाची मगरमिठी

यापूर्वी पैंगणकर यांच्या पत्नी या वार्डाच्या पंच होत्या. त्यांनी या वार्डात भरीव विकास कामे केली आहेत. त्यांच्या विकास कामांनी नागरिक समाधानी होते. मात्र त्यांचे आकस्मिक निधन झाले. यानंतर सुनील पैंगणकर यांनी आपल्या पत्नीच्या अर्धवट राहिलेल्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि विकास कामांचा धडाका सुरु ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न सूरु केले आहेत.

त्याचाच भाग म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत ही निवडणूक लढण्याचा निर्धार करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आणि त्यांच्या विराधात कोणीही अर्ज न भरल्याने ते बिनविरोध निवडले जातील असे चित्र सध्या आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com