गोव्यातील बारा आमदार अपात्रता प्रकरणी 'मगो' आणि 'काँग्रेस'ची सर्वोच्च न्यायालयात धाव

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

गोव्यातील बारा आमदार अपात्रता प्रकरणी आता 26 फेब्रुवारीला विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर सुनावणी घेणार आहेत.

पणजी : गोव्यातील बारा आमदार अपात्रता प्रकरणी 26 फेब्रुवारीला विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर सुनावणी घेणार आहेत. बारा आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींनी सुनावणी लवकर घ्यावी यासाठी काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

कोरोना महामारीचे कारण देत गेल्यावर्षी या दोन्ही अपात्रता याचिकांवर सुनावणी घेण्याचे सभापतींनी पुढे ढकलले होते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून दोन तर काँग्रेस मधून दहा आमदारांनी आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या कृतीला दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतला आहे आणि पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी या आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी करणाऱ्या याचिका काँग्रेस आणि मगोकडून सभापती समोर सादर करण्यात आलेल्या आहेत.

राज्यात दहा अपघातप्रवण क्षेत्रे

मात्र, त्यावर सभापतींनी त्वरित निर्णय न दिल्याने दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात आता या प्रकरणी नऊ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. दरम्यानच्या काळात सभापतींनीही आपण सुनावणी घेण्याची तयारी केली आहे.

संबंधित बातम्या