मगोपचे नेते प्रेमानंद नानोस्करांनी आम आदमी पक्षात केला प्रवेेश

आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय संयोजक श्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) प्रवेश केला.
मगोपचे नेते प्रेमानंद नानोस्करांनी आम आदमी पक्षात केला प्रवेेश
Arvind Kejriwal & Premanand NanoskarDainik Gomantak

दाबोळीमधून मगोपचे (Maharashtrawadi Gomantak Party) माजी उमेदवार प्रेमानंद नानोस्कर (Premanand Nanoskar) यांनी आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय संयोजक श्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात (Aam Aadmi Party) प्रवेश केला. नानोस्कर यांनी काल मगोपचा राजीनामा दिला होता. 2 च्या विधानसभा निवडणुकीत नानोस्कर दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. नानोस्कर प्रथम २७ व्या वर्षी वास्को मुरगाव नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उभे राहिले. दाबोळीचे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणारे प्रेमानंद (बाबू) नानोस्कर याने मोगो पक्षाचा राजीनामा अगोदर देऊन आम आदमी पक्षात प्रवेश केला.

प्रेमानंद नानोस्कर याने मगो पक्षाचा राजीनामा काही वैयक्तिक कारणांमुळे दिल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले होते. यामुळे नानोस्कर भविष्यात कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी चर्चा सुरू होती. अखेर त्या चर्चेला पूर्णविराम लागला. प्रेमानंद नानोस्कर याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यामुळे कदाचित दाबोळीतून आम आदमी पक्षाची उमेदवारी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नानोस्कर यांना मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

Arvind Kejriwal & Premanand Nanoskar
प्रसिद्ध कोकणी साहित्यिक 'दिलीप बोरकर' यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री

दाबोळीत नानोस्कर यांचा बऱ्यापैकी दबदबा असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना यशही मिळू शकते, असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे सांगणे आहे. आम आदमी पक्षाचे कार्य दाबोळीतुन नानोस्कर पुढे नेण्यासाठी सक्षम असून, त्यांच्या अध्यक्षते खाली पक्ष येथून चांगली भरारी मारू शकतो असे दाबोळी येथील मतदार सांगत आहे. 2010 च्या कौन्सिलर निवडणुका त्यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या आणि ते उपाध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी 2012 आणि 2017 मध्ये मगोप तिकिटावरून विधानसभा निवडणूकही लढवली होती. आपल्या परिसरातील सामाजिक कार्यासाठी ओळखले जाणारे नानोस्कर रहिवाशांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत आहेत.

Related Stories

No stories found.