गोवा विधानसभा निवडणूकीत मगो 24 जागा लढवणार: आमदार ढवळीकर

पक्षाची 4 नोव्हेंबरपासून राज्यातील तालुकावार रथयात्रा सुरू होणार आहे, अशी माहिती मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी दिली.
गोवा विधानसभा निवडणूकीत मगो 24 जागा लढवणार: आमदार ढवळीकर
Sudin DhavalikarDainik Gomantak

पणजी: आगामी विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly elections) मगो पक्ष 24 जागा लढवणार आहे. 12 मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्‍चित झाली असून त्यासंदर्भात पक्षाची कार्यकारिणी समिती लवकरच जाहीर करील. 16 जागांबाबत समिती युती किंवा अपक्षांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेईल. पक्षाची 4 नोव्हेंबरपासून राज्यातील तालुकावार रथयात्रा सुरू होणार आहे, अशी माहिती मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी दिली.

भाजप सरकारवर (BJP government) अरिष्टावर अरिष्टे येत आहेत. निसर्गही त्यांच्‍यावर नाराज आहे. जनतेला अजूनही आर्थिक मदत मिळाले नाही. त्यामुळे या सरकारने आत्मनिर्भरऐवजी आता आत्मनिरीक्षण करण्याची वेळ आली आहे असा टोला ढवळीकर यांनी लगावला.

Related Stories

No stories found.