'मोपा विमानतळावरील नोकऱ्यांसाठी मगो पक्ष मोफत ट्रेनिंगची सोय करणार'
Mopa AirportDainik Gomantak

'मोपा विमानतळावरील नोकऱ्यांसाठी मगो पक्ष मोफत ट्रेनिंगची सोय करणार'

पेडणे (Pernem) तालुक्यातील 13 व्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळासाठी (Mopa Airport) पाच गावातील शेतकऱ्याच्या 90 लाख चौरस मीटर जमिनी सरकारने घेतलेल्या आहे,

मोरजी: पेडणे (Pernem) तालुक्यातील 13 व्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळासाठी (Mopa Airport) पाच गावातील शेतकऱ्याच्या 90 लाख चौरस मीटर जमिनी सरकारने घेतलेल्या आहे, आणि आता भुमिपुत्राना शेतकऱ्यांच्या मुलाना विमानतळावर नोकऱ्या मिळवण्यासाठी अडीच लाख रुपये भरुन फायर फायटर ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे मग आमच्या भुमिपुत्राना मोफत नोकऱ्या कश्या मिळतील असा सवाल करून पेडणे मतदार संघातून मगोचा आमदार निवडून आला तर मोफत ट्रेनिंगसाठी सोय केली जाईल अशी ग्वाही मगोचे नेते प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) यांनी मोपा विमानतळ विषयी पेडणे मामलेदार अनंत मलिक याना निवेदन दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मगो केंद्रीय समितीचे सदस्य सुदीप कोरगावकर (Sudip Korgaonkar), नरेश कोरगावकर, प्रवक्ते उमेश तळवणेकर, राजन म्हापसेकर, उदय महाले, आदी उपस्थित होते.

मोपा विमानतळासाठी फायर फायटर साठी पूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी २ लाख ३६ हजार रुपये सहा महिन्यासाठी दोन हप्त्यांनी भरावी लागणार आहे, आणि ते ट्रेनिंग उत्तरप्रदेश, हैद्राबात या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. त्या वीरोधात पेडणे मगो तर्फे पेडणे उपजिल्हाधिकारी, मामलेदार याना निवेदन देवून फेर विचार करण्याची मागणी केली आहे. मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे मोपा विमानतळाविषयी चुकीची माहिती देवून फटिंग पणा करत आहे, लोकांच्या जमिनी खोटी आश्वासने देवून घेतली, त्याना अजून मोबदला मिळालेला नाही.

Mopa Airport
Goa Trip: गोव्यातील 'या' इको- फ्रेंडली रिसॉर्ट्सला नक्की भेट द्या

मोपासाठी लोकांनी त्याग केला त्याना रस्त्यावर आणणले शेतकऱ्याना पोलीस कोठडीत ठेवले. नोकरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आश्वासन देऊन जमिनी घेतल्या. आश्वासने त्याची कोण पूर्ण करणार, बाबू आता लोकांच्या दारावर जावून नोकऱ्या देण्याची खोटी आश्वासने देतात, आता नोकरी मिळवण्यासाठी अडीच लाख रुपये भरावे लागणार आहे. आणि जर लोकांकडे अडीच लाख असते तर ते कोणताही व्यवसाय करणार होते असे आर्लेकर यांनी सांगितले.

मोफत ट्रेनिंग सेंटर आणा

प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना आता सरकारने मोफत ट्रेनिंग सेंटर आणून बेरोजगार युवकाना ट्रेनिंग द्यावी, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यात लक्ष घालून बाबू जी चुकीची माहिती देतो त्याना समज द्यावी अशी मागणी केली.

शेतकऱ्यांच्या मुलाना की भाजपच्या पुत्राना नोकऱ्या: उदय महाले

पिडीत शेतकरी उदय महाले यांनी बोलताना मोपा विमानतळावर नोकरी पाहिजे असेल तर सहा महिने प्रशिक्षण घेण्यासाठी 2 लाख 36 हजार रुपये भरावे लागतात. हि नोकरी भूमिग्रस्ताना कि भाजपा सरकारच्या भुमिपुत्राना असा सवाल उदय महाले यांनी उपस्थित केला आहे. भाजपा सरकारची आता बोलती का बंद झाली असा प्रश्न महाले यांनी करून आता भूमिपुत्रावर अन्याय होत नाही का, शेतकरी शेतात राबून घरसंसार चालवणारा आपल्या मुलासाठी अडीच लाख भरून नोकरी मिळवू शकतो का असा सवाल करून बाबू आजगावकर यांची कुठे गेली आश्वासने असा सवाल करून फक्त दादागिरीच्या भीतीने, गुलामगिरी आणि लाचारी का पत्कारुया असा सवाल केला.

Mopa Airport
Goa Tourist Places: दिवाळीच्या सुट्टीमध्ये 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

विमानतळाच्या नावाने जमीन घोटाळा; उमेश तळवणेकर

मगोचे प्रवक्ते उमेश तळवणेकर यांनी बोलताना बाबू आजगावकर यांनी सरकारच्या माध्यमातून मोपा विमानतळाच्या नावाने पाच गावातील 90 लाख चौरसमीटर जागा घेवून मोठा जमीन घोटाळा केला आहे. असा दावा करून आपण त्याचा निषेध करतो असे सांगितले.

अन्यथा मगो पक्ष माघार घेईल .....

मोपा विमानतळासाठी सरकारने चुकीच्या मार्गाने जमिनी घेतलेल्या आहे, शिवाय जमिनी घेताना तालुक्याच्या मामलेदार उपजिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांची एकही जाहीर जनसुनावणी घेतली नाही, त्याच्या हरकती जाणून घेतल्या नाही. आणि त्यांनी घेतले असेल असा एक पुरावा सादर केला तर आम्ही आगामी निवडणुकीत पेडणे मधून मगो पक्ष लढणार नसल्याचे जाहीर केले, मगो पक्ष स्वाभिमानी नागरिकांच्या बहुजन समाजाचा पक्ष आहे. तोच पक्ष सत्येवर येताच मोपा विमानतळाचा प्रश्न सोडवणार अशी ग्वाही तळवणेकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com