महाशिवरात्री 2021: गोव्यात महादेवाच्या अभिषेकासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा

महाशिवरात्री 2021: गोव्यात महादेवाच्या अभिषेकासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा
Mahashivratri 2021 Queues of devotees for the anointing of Lord Shiva in Goa since morning

पणजी: गोवा राज्यात महाशिवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणच्या श्रीशंकर महादेवच्या देवस्थानात अभिषेक करण्यासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा लागल्या आहेत.

शंकरवाडी व ताडमाड - ताळगाव तसेच पर्वरी येथील देवालयामध्ये पहाटेपासूनच पूजा अर्चा व अभिषेक सुरू आहे. यानिमित्त काही देवस्थानतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड 19 च्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी भाविकांसाठी दिला जाणारा महाप्रसाद रद्द करण्यात आला आहे.

प्रत्येक भाविकाला तोंडाला मास्क लावण्याची तसेच सुरक्षित अंतर ठेवून दर्शन घेण्यासाठी मंदीरात स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहे. कोरोना महामारी असली तरी श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह दिसत आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com