अविश्वास ठरावात मांद्रेचे सरपंच महेश कोनाडकर पराभूत

सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर 7-4 असा अविश्वास ठराव पास
Mandrem Panchayat
Mandrem PanchayatDainik Gomantak

सरपंच निवड झाल्यावर मांद्रे पंचायतीचे सरपंच महेश कोनाडकर यांना 24 तासांच्या आत अविश्वास ठरावासारख्या नामूष्कीला सामोरे जावे लागले होते. त्यामूळे मांद्रे पंचायतीत सरपंच निवडीवरुन दोन गट पडल्याचे स्पष्ट झाल्याने दयानंद सोपटे समर्थक कोनाडकर यांच्या विरोधात जित आरोलकर यांच्या गटाने अविश्वास प्रस्ताव आणला होता. याचा आता निर्णय समोर आला आहे. ज्यात महेश कोनाडकर यांना संरपंच पद सोडावे लागले आहे.

(Mahesh Konadkar lost No confidence motion in Mandrem Panchayat )

Mandrem Panchayat
Sagar Ekoskar : वादग्रस्त पोलीस अधिकारी एकोस्कर यांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा

मिळालेल्या माहितीनुसार आज सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर मांद्रे पंचायतीत विरोधी पॅनेलमध्ये 7-4 असा अविश्वास ठराव पारित केला आहे. यामूळे सरपंच महेश कोनाडकर पराभूत झाले आहेत. विरोधी पॅनेल 7 ने जिंकले आहे. त्यामूळे नवा सरपंच आता मांद्रे पंचायतीचा कारभार हाताळणार आहेत.

Mandrem Panchayat
Ganesh Chaturthi : बाणास्तारीत आजही माटोळी बाजार

काय झाले होते नेमके प्रकरण ?

विरोधी पॅनेलने सरपंच महेश कोनाडकर यांना 24 तासांच्या आत अविश्वास ठराव दाखल केल्याने हा विषय राज्यभर चर्चेत आला होता. गोवा राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर 23 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी पंचाच्या शपथ पार पडल्या होत्या. याबरोबरच पेडणे तालूक्यातील मांद्रे ग्रामपंचायतीतील सरपंचाची निवड होऊन एक दिवस झाले असताना नवनिर्वाचित सरपंच महेश कोनाडकर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाला मांडण्यात आला.

दयानंद सोपटे समर्थक कोनाडकर यांच्या विरोधात जित आरोलकर यांच्या गटाने अविश्वास प्रस्ताव आणला असल्याची माहिती समोर आली. यावर विस्तार अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली आहे. या दिवशी विस्तार अधिकारी सर्व पंचांचे मत घेत ठराव घेतला असून यावर निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com