कांदा दरवाढीविरोधात महिला प्रदेश काँग्रेसचे आंदोलन

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने काल कांद्याच्या दरवाढीविरोधात स्वस्तात कांदे विकून आंदोलन केले. २५ रुपये किलो दराने प्रती व्यक्तीस एक किलो कांदा देण्यात आला. याप्रसंगी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर टीकास्र सोडले. त्याचबरोबर शिधापत्रिकांवर जसे कांदा विक्री होणार आहे, तसा कांदा फलोत्पादन महामंडळावर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पणजी : प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने काल कांद्याच्या दरवाढीविरोधात स्वस्तात कांदे विकून आंदोलन केले. २५ रुपये किलो दराने प्रती व्यक्तीस एक किलो कांदा देण्यात आला. याप्रसंगी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणावर टीकास्र सोडले. त्याचबरोबर शिधापत्रिकांवर जसे कांदा विक्री होणार आहे, तसा कांदा फलोत्पादन महामंडळावर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
सोमवारी सायंकाळी साडेचारच्या महापालिकेच्या मार्केट समोरील प्रमुख प्रवेशद्वारासमोर ठाण मांडून महिला प्रदेश काँग्रेसच्यावतीने कांदा दरवाढीविरोधात आंदोलन केले.

याप्रसंगी स्वस्तात कांदा विक्री करावी, राज्यातील फलोत्पादन महामंडळांच्या दुकानांवर स्वस्त दरातील कांदा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल. राज्य सरकार शिधा पत्रिकांवर कांदा उपलब्ध करून काय साध्य करीत आहे, असा सवाल करीत कुतिन्हो म्हणाल्या की, कांदा हा स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक आहे. कांद्यावरून यापूर्वीही आंदोलन झालेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे कांद्याचे दर वाढत आहेत. 

कुतिन्हो म्हणाल्या की, जेवनात कांदा नसला तरी चालतो, असे म्हणणाऱ्या शीतल नाईक यांना स्मृती इराणी कांद्याच्या दराविरुद्ध आंदोलन करीत होत्या तेव्हा तुम्ही कांद्याविना रुचकर जेवण होत असल्याचे का सांगायला हवे होते. जर भाजपच्या महिलांना गरीब महिलांची एवढी आपुलकी वाटत असती, तर या दरवाढीविरुद्ध रस्त्यावर उतरल्या असत्या. शाकाहारी जेवणासाठी कांदा हा उपयोगी आहे. सध्या कांद्याचे दर जे वाढले आहेत, ते पाहता ते परवडणारे नाहीत. याप्रसंगी उपस्थितांना २५ रुपये किलो अशा दराने प्रत्येकी एक किलो कांदा विक्री करण्यात आली. कुतिन्हो यांनी कांद्याची माळ गळ्यात घालत दरवाढीचा निषध केला.

संबंधित बातम्या