गोव्याचा कुख्यात गॅंगस्टर अन्वर शेख हल्लाप्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

आर्लेमच्या व्यस्त गल्लीत गोव्याचा गॅंगस्टर अन्वर शेख याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या दोन आठवड्यांनंतरही या प्रकरणातला मुख्य आरोपी असलेल्या वेल डी कोस्टाला व त्याचा साथीदार आमीर गवंडी यांना अटक कऱण्यात पोलिसांना अपयश आलं आहे.

फातोर्डा : आर्लेमच्या व्यस्त गल्लीत गोव्याचा कुख्यात गॅंगस्टर अन्वर शेख याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या दोन आठवड्यांनंतरही या प्रकरणातला मुख्य आरोपी असलेल्या वेल डी कोस्टा व त्याचा साथीदार आमीर गवंडी यांना अटक कऱण्यात आलेलं नाही. फातोर्डा पोलिसांना या आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी त्यांच्याविरूद्ध लूकआऊट नोटीस बजावली आहे. 

गोव्यातील 12वींच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

वेल डी कोस्टा प्राणघातक हा अन्वर शेखवर झालेल्या हल्ल्यामागील सूत्रधार आहे. पोलिसांनी सांगितले की, तो त्याच्या सथीदारांना अटक कऱण्यात आली त्यावेळी घटनास्थळी उपस्थित होता, परंतु, त्याला तेथून पलायन कऱण्यास यश मिळाले. वेल डी कोस्टा याला काही महिन्यांपूर्वी नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबटिस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत बेकायदेशीर मादक पदार्थांच्या व्यापार प्रकरणात अटक करण्यात आली होता. या अटकेमागे अन्वर शेखचा हात असल्याचा संशय कोस्टाला होता.

गोवा महापालिका निवडणूकीसाठी 205 उमेदवारी अर्ज दाखल

त्यामुळे या अटकेचा बदला घेण्यासाठी त्याने अन्वर शेखवर जीवघेणा हल्ला केला. अन्वर शेखवर 16 फेब्रुवारी रोजी लोखंडी रॉड, चॉपर व काठीने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोरांपैकी एकाने त्याच्यावर गोळी झाडली. हत्येचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्रे देऊन दंड केल्याचा आरोप आयपीसीच्या अनेक कलमांनुसार तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत फातोर्डा पोलिसांनी दोषींवर गुन्हा दाखल केला आहे. 

संबंधित बातम्या