धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

प्रतिनिधी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : साखळीत पंचमाया सभागृहाचे उद्‌घाटन

डिचोली:  देवदेवतांची मंदिरे आदी धार्मिक स्थळांना महान संस्कृती आहे. ही धार्मिक स्थळे आपणासर्वांना एकत्रित आणून एक - दुसऱ्यांशी एकोप्याने वागण्याची शिकवण देत असतात. प्रत्येक धार्मिक स्थळाला वेगळं असं पावित्र्य असते. त्या पावित्र्याची महती प्रत्येकाने सांभाळून ठेवणे यातच भारतीय संस्कृती सामावलेली असते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

सुमारे दहा लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मावळंगतड-साखळी येथील श्री पंचमाया सभागृहाच्या उद्‌घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. त्यांच्याच हस्ते नारळ वाढवून आणि फीत कापून या सभागृहाचे उद्‌घाटन करण्यात आले. सामाजिक अंतर पाळून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्यासमवेत प्रभागाचे नगरसेवक दयानंद बोर्येकर, नगरसेवक आनंद काणेकर, कायतान फर्नांडिस आणि स्थानिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या