Panchwadi WTP Accident: पंचवाडी पाणी प्रकल्पात क्लोरीन लिकेजमुळे मोठा अपघात; 4 कामगार अत्यवस्थ

कामगारांना केले रुग्णालयात दाखल
Hospital
Hospital Dainik Gomantak

म्हापा - पंचवाडी येथे पाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये क्लोरिन लिकेज असल्याची माहिती समोर आली होती. हे लिकेज काढताना 4 कामगार गुदमरले असून, प्रकृती अत्यावस्थेमुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

(Major accident due to chlorine leakage in panchwadi WTP project)

Hospital
Rohan Khaunte: गोव्याचे माहिती तंत्रज्ञान रोहन खंवटे म्हणतात; रामायण महाभारत महत्वाचे ग्रंथ

मिळालेल्या माहितीनुसार म्हापा - पंचवाडी येथे पाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. या प्रकल्पात क्लोरिनची लिकेज झाले होते. याचा प्रकल्पाच्या कार्यक्षमेवर परिणाम होत असल्याने ते काढण्याच्या प्रयत्नात असलेले चार कामगार गुदमरले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मडगांव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Hospital
Goa News: सचिन बोरकरांच्या जामिनावर आज फैसला

रात्री उशिरा ही घटना घडली असून रुग्णालयात दाखल केलेल्या कामगारांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र कामगारांनी लिकेज काढताना सर्व काळजी घेतली होती. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरीही ही घटना घडलीच कशी? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. मात्र कामगारांकडून याची माहिती घ्यावी लागणार असल्याचं काही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या घटनेतील कामगारांची नावे समजू शकलेली नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com