Goa Accident : भरधाव दुचाकी थेट कंटेनरच्या चाकाखाली; उसगावात पुन्हा भीषण अपघात

फोंड्याजवळच असलेल्या उसगाव एमआरएफ फॅक्टरीजवळ आज सोमवारी सकाळी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे.
goa accident
goa accidentDainik Gomantak

Goa Accident : फोंड्याजवळच असलेल्या उसगाव एमआरएफ फॅक्टरीजवळ आज सोमवारी सकाळी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव दुचाकीची कंटेनरशी टक्कर झाल्याने पुन्हा एकदा या परिसरात वाढलेल्या अपघातांबाबत स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. अपघातात दुचाकी भरधाव कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचारही सुरु करण्यात आले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे याठिकाणी असलेल्या यूटर्नला बंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

दुसरीकडे न्हयबाग येथे महामार्गावर काल रविवारी दुपारी कंटेनरच्या धडकेत माजगाव-सावंतवाडी येथील ओडीसी इलेक्ट्रिक बाईक शोरूमचे मालक तथा निवृत्त सैनिक विजय रमेश गावकर (45) यांचा जागीच मृत्यू झाला.

विजय गावकर हे काही कामानिमित्त सातोसे येथे गेले होते. तेथून ते आपल्या इलेक्ट्रिक दुचाकीने (क्र. MH 07 Q 0395) सावंतवाडीला जात होते. न्हयबाग पेडणे येथे पोहोचल्यावर पाठीमागून वेगात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने (क्र. NL 01 AE 6331) पुढे असलेल्या गावकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ते मागच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाले.

goa accident
Goa Crime : माता न तू वैरिणी; मानसिक तोल गेल्याने आईनेच घेतला चिमुकल्‍याचा जीव

सुदैवाने अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी आपल्या दोन मुलांसह पत्नीला नातेवाईकांच्या घरी सोडले होते. या प्रकरणी पेडणे पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात पाठवला आहे. तर कंटेनर चालक दिपक दुबे याला ताब्यात घेतले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com