गुळे येथे दोन कारची समोरासमोर टक्कर
Car Accident in Gulem GoaDainik Gomantak

गुळे येथे दोन कारची समोरासमोर टक्कर

भीषण अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत; कारचा मात्र चेंदामेंदा

काणकोण : गोव्यात अपघातांचं सत्र थांबत नसल्याचं चित्र आहे. दरदिवशी गोव्याच्या विविध भागात अपघातांमुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागत आहे. यातच भर म्हणून करमलघाट पायथ्याशी मडगाव-कारवार हमरस्त्यावर गुळे येथे काल रविवारी सकाळी दोन वाहनांत टक्कर झाल्याने या अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले.

जीए-08 व्ही-3616 ही कार मडगावहून गुळे येथे आगोंद रस्त्यावर वळण घेत असताना समोरून केए-30 एम-5020 या क्रमांकाचे वाहन आल्यानंतर दोन्ही वाहनांत जोरदार धडक झाली. या अपघातात गोव्याच्या रेंट ए कारने रस्त्याजवळच्या झाडाला धडक दिली तर कर्नाटकची कार रस्त्याच्या कडेला झाडीत गेली.

Car Accident in Gulem Goa
'गोव्यात अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासासाठी 'रोड मॅप' तयार करणार'

या अपघात दोन्ही कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, दोन्ही कारचे जबरदस्त नुकसान झाले आहे. या अपघाताची पोलिसांत नोंद झाली असून, काणकोण पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. वाढत्या अपघातांमुळे गोव्यात रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com