वादळी पावसामुळे अठरा हेक्टर शेती-बागायतीचे मोठे नुकसान

सुभाष महाले
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

काणकोणात वादळी पावसामुळे १० ऑगस्टपर्यंत सोळा हेक्टर शेती-बागायती जमिनीची नुकसानी झाली आहे. सर्वाधिक नुकसानी खोतीगावातील पणसुलेमळ व अन्य भागात झाली आहे. त्याचप्रमाणे खोला पंचायत क्षेत्रात झाली असल्याचे काणकोणचे विभागीय कृषी अधिकारी शिवराम नाईक गावकर यांनी सांगितले. 

काणकोण

काणकोणातील ५ हेक्टर जमिनीतील ऊस शेती, ४ हेक्टर जमिनीतील भात शेती, ५ हेक्टर जमिनीतील बागायती व २ हेक्टर जमिनीतील भाजी पिकाची नुकसानी झाली आहे. यापैकी बहुतेक शेती जलस्त्रोताच्या किनाऱ्यालगतची आहे. मुसळधार पावसात जलस्त्रोतांना पूर येऊन किनाऱ्यालगत असलेल्या शेती- बागायतीत पाणी घुसून नुकसानी झाली असल्याचे विभागीय कृषी अधिकारी नाईक गावकर यांनी सांगितले.मुरगाव पालिका कामगारांच्या संपामुळे पालिका क्षेत्रात सर्वत्र अशाप्रकारे कचरा विखुरलेला होता. 

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या