मळकर्णेत घरावर वीज कोसळून मोठे नुकसान; माय लेकींचे जीवनदान  

दैनिक गोमंतक
गुरुवार, 29 एप्रिल 2021

शिरदोण-मळकर्णे येथील गरीब महिला श्रीमती कामिनी कृष्णा गावकर यांच्या घरावर मंगळवारी रात्री वीज कोसळली. रात्री विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडला. गावकर यांच्या घरावर वीज कोसळल्याने त्यांच्या स्वयंपाक घराचे मोठे नुकसान झाले.

कुडचडे: शिरदोण-मळकर्णे येथील गरीब महिला श्रीमती कामिनी कृष्णा गावकर यांच्या घरावर मंगळवारी रात्री वीज कोसळली. रात्री विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडला. गावकर यांच्या घरावर वीज कोसळल्याने त्यांच्या स्वयंपाक घराचे मोठे नुकसान झाले. घरात घुसलेली वीज अन्य खोलीतून पुन्हा घराबाहेर पडण्याची विचित्र घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. श्रीमती कामिनी कृष्णा गावकर ही महिला रात्री साडे नऊच्या दरम्यान आपल्या दोन मुलींसह झोपी गेली.( Major damage due to power outage on a house in goa 
)

Goa Lockdown: पहा काय सुरु काय बंद

रात्री दहाच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडू लागल्याने घरात पावसाचे पाणी गळू लागले त्यामुळे कामिनी उठून काठीच्या साहाय्याने गळणारे पाणी बंद करण्यासाठी कौले सरकवू लागल्या. इतक्यात विजांचा गडगडाट सुरू होताच स्वयंपाक घराच्या खोलीतून वीजजनित्रे बसविलेल्या भिंतीचा गोलाकार भाग कामिनी आपल्या मुलींना घेऊन झोपली होती त्या खोलीत पडला. भिंतीचे चिरे माती अंथरुणावर पडली. मात्र पडलेली वीज दुसऱ्या खोलीची भिंत फोडून पुन्हा बाहेर गेली. या घटनेत कामिनी आणि तिच्या दोन मुली बिथरल्या होत्या.

पण पावसाचे गळणारे पाणी बंद करण्यासाठी कामिनी उठल्याच नसत्या तर अनर्थ घडला असता, केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र घरातील वीजजनित्रे आणि इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शेजारी लोक व आमदार प्रसाद गावकर, उपसरपंच दीपक नाईक, पंचायत सदस्य संदेश गावकर, रमेश मळीक यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार गावकर यांनी गावकर यांना आपण शक्य ती मदत करणार असल्याचे सांगितले. उपसरपंच दीपक नाईक म्हणाले, या घटनेत कामिनी गावकर यांच्या कुटुंबातील कोणालाही इजा झाली नाही ही परमेश्वराची कृपा जरी असली तरी पंचायत निधी फार मोठा देऊ शकत नाही.त्यामुळे सरकारने कामिनी गावकर यांच्या घराची दुरुस्ती करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी.

लॉकडाऊनमुळे गोव्यातील पर्यटन व्यवसाय अडचणीत; 'ही' आहेत कारणे

वीजपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी संदेश गावकर यांनी पुढाकार घेतला आहे. घराच्या भिंती, पत्रे यांचेही मोठे नुकसान झाले असून वीज घरातून बाहेर जाताना परस बागेतील तीन पोफळीच्या झाडांची हानी करून गेली. काळच आला होता पण पोरींचे नशीब म्हणून आम्ही वाचलो, अशी प्रतिक्रिया कामिनी गावकर यांनी दिली.

संबंधित बातम्या