गोव्यात एक दिवस व्होडाफोन-आयडिया नेटवर्क डाऊन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

सध्या व्हीआय कंपनीच्या कार्ड वापरणाऱ्यांना नेटवर्कच्या समस्येला तोंड द्यावे लागले. आज सकाळी काही शाळांच्या शिक्षकांकडे नेटवर्कच्या समस्याही विद्यार्थी-पालकांनी मांडल्या. परंतु महाराष्ट्रातही या सेवेचा बोजवारा उडाल्याची बातमी कळाल्यानंतर लोकांचा राग थोडा कमी झाला. 

 पणजी- मोबाईल नेटवर्किंगासाठी इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी महाराष्ट्राला गोवा जोडला गेला आहे. कालपासून (बुधवार) व्होडाफोन-आयडिया (व्हीआय) या कंपन्यांच्या नेटवर्क डाऊन झाल्याने या कंपनीची सेवा घेणारे गोव्यातील ग्राहकांना त्रास झाला. 

सध्या शाळांचे क्लासेस ऑनलाईन सुरू आहेत. अनेक शाळांचे क्लासेस सकाळच्या सत्रात दिले जातात. काही वर्गांच्या ऑनलाईन परीक्षा सुरू आहे, अशा काळात सध्या व्हीआय कंपनीच्या कार्ड वापरणाऱ्यांना नेटवर्कच्या समस्येला तोंड द्यावे लागले. आज सकाळी काही शाळांच्या शिक्षकांकडे नेटवर्कच्या समस्याही विद्यार्थी-पालकांनी मांडल्या. परंतु महाराष्ट्रातही या सेवेचा बोजवारा उडाल्याची बातमी कळाल्यानंतर लोकांचा राग थोडा कमी झाला. 

या सर्व प्रकाराचा राग काही लोकांनी समाजमाध्यमांतून काढला आहे. काही नेटकऱ्यांनी कंपनीच्या सेवेवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. जे मोबाईलधारक आहेत, ते एकाच कार्डवर इंटरनेटची सेवा घेतात. दुसऱ्या कार्डचा फक्त बोलण्यासाठी वापर करतात. ज्यांच्याकडे दोन वेगवगेळ्या कंपन्यांच्या सेवा आहेत, त्यांना फार काही त्रास जानवला नाही. परंतु केवळ ‘व्हीआय'' कंपनीची सेवा घेतलेल्यांना मात्र मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. सायंकाळी सातच्या नंतर राज्यात काही ठिकाणी व्हीआयची सेवा सुरू झाली खरी, पण ती काही काळच होती. 

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घाला...
राज्यात सकाळपासून नेटवर्कची समस्या भेडसावू लागली आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ऐन पावसाळ्यात नेटवर्कमुळे त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी काँग्रेसच्या भारतीय विद्यार्थी संघटनेने केली आहे. राज्य सरकार नेटवर्क सुविधा उलबब्धकरून देण्यात अपयशी ठरले आहे.
 

संबंधित बातम्या