करोनाच्या पार्श्वभूमीवर डिचोली तालुक्यातील प्रमुख मंदिरे खुली

'कोविड' महामारीचे संकट असले, तरी डिचोली तालुक्यातील प्रमुख मंदिरांसह बहूतेक सर्व मंदिरे खुली करण्यात असून, या मंदिरांतून पूजा आदी धार्मिक विधी नित्यनेमाने चालू आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर डिचोली तालुक्यातील प्रमुख मंदिरे खुली
डिचोलीत प्रमुख मंदिरे भाविकांना खुली करण्यात आली; राष्ट्रीय नेते घेताहेत जागृत देवतांचे दर्शन. Dainik Gomantak

डिचोली: 'कोविड' महामारीचे (covid pidemic) संकट असले, तरी डिचोली (Bicholim taluka ) तालुक्यातील प्रमुख मंदिरांसह (temples) बहूतेक सर्व मंदिरे खुली करण्यात असून, या मंदिरांतून पूजा आदी धार्मिक विधी नित्यनेमाने चालू आहेत. भाविकांनाही देवदर्शनासाठी मंदिरे खुली आहेत. मात्र क्वचित अपवाद सोडल्यास स्थानिक भाविकांची मंदिरांतून ये-जा चालू असते.

डिचोलीत प्रमुख मंदिरे भाविकांना खुली करण्यात आली;  राष्ट्रीय नेते घेताहेत जागृत देवतांचे दर्शन.
मोरजीत चित्र प्रदर्शनाला विदेशी पर्यटकांचा प्रतिसाद

शिवकालीन नार्वे येथील ऐतिहासिक श्री सप्तकोटीश्वर, साखळीतील श्री दत्त मंदिरांसह श्री पांडुरंग (विठ्ठलापूर) श्री रुद्रेश्वर (हरवळे), श्री लईराई (शिरगाव), श्री शांतादुर्गा (डिचोली) आदी काही प्रमुख मंदिरे आहेत. 'कोविड' महामारीमुळे गेल्या वर्षीपासून प्रमुख देवस्थानच्या जत्रा आदी प्रमुख उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. सलग दोन वर्षे शिरगावच्या लईराई देवीच्या जत्रेवर निर्बंध आले आहेत. साखळीतील चैत्र उत्सवावरही निर्बंध आले आहेत. तरी डिचोली तालुक्यातील काही मंदिरांतून मार्गदर्शक नियमांचे पालन करून लहानमोठे उत्सव साजरे करण्यात येत आहेत. नार्वेतील श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे सौंदर्यीकरण काम चालू असल्याने भाविकांची संख्या मर्यादित आहे.

डिचोलीत प्रमुख मंदिरे भाविकांना खुली करण्यात आली;  राष्ट्रीय नेते घेताहेत जागृत देवतांचे दर्शन.
मोरजीतील मच्छिमार व्यावसाईक अजूनही नुकसान भरपाईपासून वंचित

राष्ट्रीय नेत्यांकडून दर्शन

शिरगावची लईराई म्हणजे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान. केवळ गोमंतकातच नव्हे, तर देश-विदेशात देवीची महती पसरली आहे. स्थानिक राजकीय नेत्यांसह राष्ट्रीय नेत्यांचीही लईराई देवीवर श्रद्धा असल्याची अनुभूती येत आहे. भाजपच्या महिला मोर्चाची राष्ट्रीय महामंत्री सुखप्रित कौर यांनी गेल्या ता. 7 ऑगस्ट रोजी त्यांनी शिरगावात जावून लईराई देवीचे दर्शन घेतले होते. नंतर 20 ऑगस्ट रोजी दिल्लीतील "आप" सरकारातील मंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी लईराई देवीचे दर्शन घेतले. तर 'आप'चे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या ता. 20 रोजी हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवाचे दर्शन घेवून आरतीही केली

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com