Makar Sankranti in Goa : दोन वर्षांनंतर रंगले हळदी-कुंकू समारंभ; सुवासिनींच्या चेहऱ्यावर हास्य

महागाई ठरली गौण; डिचोली तालुक्यातील सुवासिनींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
Makar Sankranti in Goa
Makar Sankranti in GoaDainik Gomantak

डिचोली : मकर संक्रांतीपासून राज्यात सर्वत्र पारंपरिक हळदी-कुंकू समारंभांना उत्साहात प्रारंभ झाला. डिचोली तालुक्यातील गावोगावी हळदी-कुंकू समारंभांना उधाण आले असून रथ सप्तमीपर्यंत हा उत्साह कायम राहणार आहे.

यंदा या सणावर महागाईचे सावट असले तरी कोविड महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा हळदी-कुंकू समारंभ मुक्त वातावरणात करता आल्याने सुवासिनींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. (Makar Sankranti in Goa)

मकर संक्रांती हा सुवासिनींचा उत्साह द्विगुणित करणारा सण आहे. मकर संक्रांतीपासून थेट रथ सप्तमीपर्यंत हळदी-कुंकू करायला मिळत असले, तरी नवविवाहितांसह बहुतेक सुवासिनी मकर संक्रांतीदिनीच पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकू समारंभ करतात.

रविवार असल्याने नोकरदार सुवासिनींनी आजच परिसरातील सुवासिनींना आग्रहाचे निमंत्रण देत हळदी-कुंकू समारंभ साजरा केला.

Makar Sankranti in Goa
Goa Opinion Poll Day:...नाहीतर 'गोवा' आज सिंधुदुर्ग जवळील महाराष्ट्राचा एक जिल्हा असता

डिचोली शहरासह सर्वण, मये, पिळगाव, मुळगाव आदी गावोगावी आज हळदी-कुंकू समारंभाचा उत्साह दिसून आला. नऊवारी लुगडे नेसून आणि साजशृंगार करून सुवासिनींनी आपापल्या भागातील देवदेवतांना वाण ठेवून त्यांचे दर्शन व आशीर्वाद घेतले.

नंतर घरी आलेल्या सुवासिनींना हळदी-कुंकू लावून वाण आणि गूळ, साखर आदी कडधान्य तसेच इतर भेटवस्तू दिल्या. ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असा संदेशही सुवासिनींनी एकमेकींना दिला.

मकर संक्रांतीच्या दिवशी गावोगावी सायंकाळी उशिरापर्यंत सुवासिनी गटागटाने हळदी-कुंकू समारंभासाठी एकमेकींच्या घरी जाताना दिसून आल्या. रथसप्तमीपर्यंत हे चित्र दिसून येणार आहे.

महागाईचे सावट, तरीही उत्साह कायम

कोविड महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात सुरू झाले. यानिमित्त सुवासिनी एकमेकींना वाण देतात. त्यात गृहोपयोगी वस्तूंसह इतर गोष्टींचाही समावेश असतो.

मात्र, यंदा वाढलेल्या महागाईचे सावट या उत्सवावर होते. तिळाचे लाइ बुडकुल्या आदी साहित्य महाग झाले आहेत. भेटवस्तूही महाग झाल्या आहेत. प्रत्येक वस्तूमागे किमान १५ ते २० टक्के वाढ झाली आहे परंतु, सुवासिनींनी महागाईची पर्वा न करता एकमेकींना वाण आणि शुभेच्छा देत मकर संक्रांतीदिवशी हळदी-कुंकू समारंभ उत्साहात साजरा केला. .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com