Make earthen Ganesha idols for the benefit of environment Rakesh Salgaonkar
Make earthen Ganesha idols for the benefit of environment Rakesh SalgaonkarDainik Gomantak

पर्यावरण हितासाठी मातीच्या गणेशमूर्ती बनवा : राकेश साळगावकर

प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे निसर्गाची हानी

मोरजी : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मूर्तीकारांनी मातीपासून मूर्ती बनवाव्यात, असे आवाहन चावदेवाडा-पार्से येथील युवा मूर्तीकार राकेश साळगावकर यांनी केले आहे..

राकेश साळगावकर हे गेल्या 12 वर्षांपासून गणेश मूर्ती तयार करतात.

केवळ चिकणमातीचा वापर करून ते दरवर्षी लहान-मोठ्या गणेश मूर्ती बनवतात. कोणतीही कला जोपासण्यापूर्वी तिची आवड असावी लागते. पारंपरिक कला प्रसिद्धी, पैसा, वैभव मिळवून देते. मात्र, त्यासाठी स्वत:मध्ये आवड निर्माण करा. जाणकारांकडून मार्गदर्शन घ्या. मुलांना मातीत खेळायला द्या, त्यांना मातीची आवड निर्माण होऊ द्या, असे राकेश साळगावकर म्हणाले.

Make earthen Ganesha idols for the benefit of environment Rakesh Salgaonkar
लोकांची फसवणूक करत कर्ज मिळवल्या प्रकरणी एकाला केली अटक

कोरोना काळात स्थानिक कलाकारांच्या मूर्ती संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. पूर्वी बऱ्याच मूर्ती परराज्यांतून आणल्या जायच्या. मात्र, आता अनेक गणेशभक्त स्थानिक मूर्तीकारांकडून मूर्ती घेतात. या कलेमध्ये आजची पिढी मागे राहण्याचे कारण म्हणजे, ही कला केवळ दोन महिन्यांसाठी म्हणजे गणेश चतुर्थीवेळीच उपयोगी येते. उर्वरित दहा महिने मूर्तीकारांना काहीच काम नसते. त्यामुळे सहसा युवा पिढी या कलेत पुढे येत नाही.

- राकेश साळगावकर, मूर्तीकार, पार्से.

मूर्तीकामात घरच्यांचे साहाय्य

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी राकेश यांना त्यांची आई आणि भाऊ मदत करतात. राकेश एका फॅक्टरीमध्ये कामाला होते. त्या ठिकाणी त्यांना ब्रेक दिल्यानंतर त्यांनी पारंपरिक गणेशमूर्ती बनवण्याच्या कलेला चालना देण्याचा निर्णय घेतला. सध्या ते तीस लहान-मोठ्या गणेशमूर्ती साकारतात. गणेश मूर्तीसाठी लागणारी माती मांद्रे परिसरातून ते आणतात. मांद्रे येथे ही माती चांगल्या प्रकारची मिळते, असा राकेश यांचा दावा आहे.

मातीच्याच मूर्ती मागा!

बाजारात सध्या हलक्या आणि ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. या मूर्ती विसर्जित केल्यावर पाण्यात विरघळत नाहीत. शिवाय त्या पाण्याच्या प्रवाहातून भरकटत जातात. नदीकिनारी त्यांची विटंबना होते. त्यामुळे प्रत्येक गणेश भक्ताने मूर्तीकाराकडे मातीची मूर्ती मागावी, असेही आवाहन राकेश साळगावकर यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com