Mapusa News: पारंपरिक पालखीची वाट मोकळी करा- मंदिर समितीची पालिकेकडे मागणी

खोर्ली म्हापसा गणेश मंदिर: पालखी त्याच रस्त्याने नेण्यावर ठाम
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak

खोर्ली म्हापसा येथील उसापकर हॉटेलजवळचा रस्ता दुरुस्तीसाठी पूर्णतः खोदला आहे. रस्ता खोदल्याने त्या भागातून पालखी नेताना बरा त्रास होईल, गणेश जयंतीनंतर या रस्त्याचे खोदकाम करा, असे आम्ही पालिकेला स्पष्ट सांगितले होते.

मात्र आमचे म्हणणे ऐकून न घेता खोदकाम केले. पण आता हा रस्ता भराव टाकून हा पालखीसाठी 25 पूर्वी पूर्ववत करावा, अशी मागणी करून याच मार्गाने पालखी प्रदक्षिणा होईल,असे खोर्ली म्हापसा येथील श्री गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग वराडकर यांनी सांगितले. गणेश जयंतीनिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत वराडकर बोलत होते.

यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे तसेच अनिल केरकर उपस्थित होते. वराडकर म्हणाले, की अनेक वर्षापासून गणेश जयंतीची पालखी उसापकर हॉटेलला वळसा घालून खोर्ली मार्गे प्रयाण करते. मात्र, यंदा हा मुख्य रस्ता मधोमध खोदून बंद केला आहे. याबाबत पालिकेने कळवूनही दखल घेतली नाही. मात्र, आम्ही आमची वार्षिक पालखी याच वाटेने नेणार असून पालिकेने त्या दिवशी तो रस्ता बुजवून द्यावा.

Mapusa News
Arambol: हरमल किनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन

संजय बर्डे म्हणाले,की दरवर्षी खोर्ली म्हापसा सर्वजनिक गणेश देवाची गणेश जयंती साजरी केली जाते. पालिकेला सांगूनही त्यांनी मुद्दाम देवस्थानच्या पालखी प्रदक्षिणेचा रस्ता खोदला आहे.या खोदकामामुळे कॉलेजचे विद्यार्थी, भाविकांना त्रास होत आहे. पालिकेचा हा मनमानी कारभार सुरू आहे. मात्र, आम्ही प्रदक्षिणेची पालखी याच रस्त्याने नेणार आहोत. त्यामुळे येथे प्लॅटफॉर्म घालून द्यावा, असे बर्डे म्हणाले.

अनिल केरकर म्हणाले, की हा रस्ता अर्धा असून येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. पर्यायी रस्त्याबाबत योग्य माहिती दिली जात नाही,त्यामुळे पर्यटक अडकून पडतात, सरकारने यावर योग्य तोडगा काढावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com