मालपे पेडणे बोगद्याचे काम चतुर्थीपर्यंत पूर्ण करण्‍याचे लक्ष्‍य

Pedne Tunnel
Pedne Tunnel

पणजी

कोकण रेल्वेच्या मालपे येथील बोगद्यात कोसळलेली संरक्षक भिंत अद्याप हटवण्यात आलेली नाही. तो बोगदा भिंत हटवताना कोसळू नये यासाठीची उपाययोजना करण्यात येत आहे. येत्या गणेश चतुर्थीपूर्वी कोकण रेल्वेमार्ग खुला करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे उपसरव्यवस्थापक (जनसंपर्क) बबन घाटगे यांनी दिली.

ते म्हणाले, हा बोगदा खोदण्याच्या वेळेपासून त्रासदायक ठरला होता. आताही तेथे पाण्याचा मोठा प्रवाह आहे. त्यामुळे कामात अडथळा येत आहेत. बोगद्याच्या छताला आणि भिंतींना टेकू लावण्याचे काम सध्या सुरू आहे. कोसळलेली भिंत हटवताना आणखीन कोणता भाग कोसळू शकतो की काय, याचा अंदाज घेण्यात येत आहे. त्याठिकाणी काम करताना खूपच काळजी घ्यावी लागत असल्याने वेगाने काम उरकता येत नाही ही वस्तुस्थिती आहे.
या कामावर सध्या ७०-८० मजूर आहेत. रत्नागिरी आणि कारवार येथील कोकण रेल्वेची अभियांत्रिकी पथके पेडण्यात दाखल झाली आहेत. सरव्यवस्थापक (कामे) गोपाळ राजू हे साऱ्यावर दैनंदिन स्वरूपात देखरेख ठेवत आहेत. एकदा भिंत व छत यांना टेकू लावून झाले की, कोसळलेल्या भिंतीचे अवशेष दूर करणे सुरू करण्यात येईल. एवढ्यावरच थांबता येणार नाही. ती भिंत पुन्हा बांधावी लागणार आहे. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त लोहमार्गाची पाहणी करतील आणि सर्वकाही योग्य असल्यास लोहमार्ग खुला करण्यास परवानगी देतील. येत्या गणेशचतुर्थीपूर्वी हे काम मार्गी लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असले तरी ते गाठणे फार कठीण आहे. बोगदा वाहतुकीस खुला करण्यापूर्वी तो प्रवासी वाहतुकीस निर्धोक असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. तेच तर आव्हान आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गणेश चतुर्थीसाठी मुंबईहून गोव्यात येऊ इच्छीणारे आणि गोव्यातून कोकणातील आपल्या गावी जाण्यास इच्छूक असणाऱ्या अनेकांच्या नजरा कोकण रेल्वेची वाहतूक कधी सुरु होते याकडे आहे. मात्र, गणेश चतुर्थीपूर्वी ही वाहतूक सुरू होणे अशक्य असल्याचे आज दिसून आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com