कोलवा समुद्रकिनाऱ्याजवळ सात हजारांच्या गांजासह २१ वर्षीय युवकाला अटक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

कोलवा किनाऱ्याजवळील पार्किंगमध्ये शंकर महूर याची झडती घेतली असता, त्याच्याकडे सात हजार रूपये किंमतीचा ७० ग्रॅम गांजा सापडला.

मडगाव- कोलवा समुद्रकिनाऱ्यावर २१ युवकाला अटक करत त्याच्याकडील ७० ग्रॅम  गांजा जप्त केला आहे. शंकर महूर असे या युवकाचे नाव असून तो मूळचा दिल्ली येथील रहिवाशी आहे. 

आज(बुधवारी) दुपारी कोलवा किनाऱ्याजवळील पार्किंगमध्ये शंकर महूर याची झडती घेतली असता, त्याच्याकडे सात हजार रूपये किंमतीचा ७० ग्रॅम गांजा सापडला. शंकर याची अधिक चौकशी केली असता तो एका बारमध्ये कामाला असल्याचे समजले.

 आरोपी शंकरला ताब्यात घेत अंमली पदार्थ प्रतिबंधात्मक  कायद्याखाली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.  पुढील तपास पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजित वेळीप करत आहेत.

संबंधित बातम्या