Goa Crime: कौटुंबिक वादातून 7 वर्षीय पुतण्याचेच केले अपहरण

पोलिसांनी केली अटक, रावणफोंड येथील घटना
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

Goa Crime: कौटुंबिक भांडणातून पुतण्याचे अपहरण करणाऱ्याला काकाला मडगाव पोलिसांनी अटक केली आहे. सुनिल पुजारी असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

मडगावमधील रावणफोंड येथे हा प्रकार घडला आहे. येथील रवी पुजारी याने रविवारी संध्याकाळी त्याच्या 7 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. रवी याने त्याच्या भावावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी पथके तयार करून तपास केला.

Goa Crime
Mahadayi Water Issue: ...तरच कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवता येईल!

त्यानंतर सुनील पुजारी याला अटक करण्यात आली. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला आहे. नेमका काय वाद होता, याची माहिती अद्याप नाही. रावणफोंड येथील शांतीनगर येथे हे दोघेही भाऊ राहतात. ते दोघेही स्वतंत्र राहतात.

या प्रकरणात तक्रार नोंदविल्यानंतर पोलीसांनी त्याला काल रात्रीच जेरबंद केले. या संशयिताकडून पोलीसांना एक स्कूटर सापडली असून ती मायणा कुडतरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतून चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे.

मडगाव येथील पोलीस निरिक्षक तुळशीदास नाईक यांनी दिलेल्या महितीनुसार संशयिताची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून त्याने हे अपहरण नेमके कशासाठी केले त्याचाशोध पोलीस घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com