कळंगुट येथे १ लाख २० हजारांचा ड्रगसाठा जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

गस्तीवर असताना विनोद हरिराम शर्मा (६२) या वृद्धाला एमडीएमए ड्रग्जप्रकरणी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून सुमारे 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

पणजी- अंमली पदार्थ सेवन विरोधी पथकाने कळंगुट येथे आणखी एकाला अटक केली आहे. गस्तीवर असताना विनोद हरिराम शर्मा (६२) या वृद्धाला एमडीएमए ड्रग्जप्रकरणी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून सुमारे 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

त्याच्याजवळ सापडलेल्या ११.९५ ग्रॅम एमडीएमए ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे १ लाख २० हजार रुपये आहे. हे ड्रग त्याने स्कुटरमध्ये लपवून ठेवले होते. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रितेश मडगावकर अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या