खोलांत समुद्रकिनाऱ्यालगत झाडाला गळफास लावून 30 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

team dainik gomantak
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

खोलांत समुद्र किनाऱ्यारपासून सुमारे तीन किलोमीटर दूर एका झाडाला एक मृतदेह लटकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक चौकशी केली असता तो हनमंतप्पाचा असल्याचे स्पष्ट झाले.

वास्को- दक्षिण गोव्यातील दाभोळी येथील हनमंतप्पा मल्लप्पा ताली नामक व्यक्तीने खोलांत भागातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नसून या प्रकरणी पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

पोलिस निरीक्षक वेर्णा नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. हनमंतप्पा हा गेल्या तीन वर्षांपासून गोवा शिपयार्डमध्ये कामाला असून तो कर्नाटक गदग येथील रहिवाशी आहे. खोलांत समुद्र किनाऱ्यारपासून सुमारे तीन किलोमीटर दूर एका झाडाला एक मृतदेह लटकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक चौकशी केली असता तो हनमंतप्पाचा असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिस उपनिरीक्षक रियंका नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हनमंतप्पा याचा सुमारे 10 महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. त्याची पत्नी ही कर्नाटकातच असून ती सध्या पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हनमंतप्पा याच्या मृत्यूचे कारण असून स्पष्ट झाले नसून उपनिरीक्षक वेर्णा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.   

संबंधित बातम्या