Vagator Video: पुन्हा बीचवर गाडी, कर्नाटक पासिंग असलेल्या वाहनाचा वागातोर येथे थरार

अशा घटना वांरवार समोर आल्या आहेत.
Vagator Beach
Vagator Beach Dainik Gomantak

गोव्यात येणारे पर्यटक बऱ्याचवेळा थरारक गोष्टी करण्याच्या नादात धोकादायक स्टंट करत असतात. गोव्यातील विविध बीचवर अनेकवेळा पर्यटक गाडी घेऊन जातात आणि धोकादायक पद्धतीने इतरांचे देखील जीव धोक्यात घालतात. अशा घटना वांरवार समोर आल्या आहेत. दरम्यान, नवीन वर्षात अनेक पर्यटक राज्यात दाखल झाले आहेत. अशात वागातोर येथून एक धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याची घटना समोर आली आहे.

Vagator Beach
Goa Beach: बोगमाळो किनाऱ्यावर वाळूत अडकली तेलंगणातील आमदाराची कार...

वागातोर बीचवर एक पिकअप धोकादायक पद्धतीने धावताना दिसत आहे. अनेक पर्यटक याठिकाणी असताना त्यांचा जीव धोक्यात घालून वाहन चालविल्याचे दिसत आहे. वाहनाचा कर्नाटक परवाना असल्याची माहिती समोर आली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांंमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा घटनांना वेळीच पायबंद घातला पाहिजे असे नागरिकांनी म्हटले आहे.

Vagator Beach
Goa Accidents : गोव्यात अपघातसत्र थांबेना! वीज खांब मोडून पोलीस कर्मचाऱ्याची कार ओहोळात पलटली

दरम्यान, 27 डिसेंबर रोजी दाबोळी बोगमाळो समुद्र किनाऱ्यावर दुपारी एकाने आपली कार चक्क किनाऱ्यावर घातली. ही कार वाळूत रूतून बसली. विशेष म्हणजे या कारवर विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार असल्याचे स्टीकर होते. ही फोर्ड कार तेलंगणातील असून टीएस 08 एफके 9786 असा या कारचा क्रमांक आहे. ही कार तेलंगणा राज्यातील आमदाराची असल्याची माहिती समोर आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com