Goa: म्हादई व रगाडा नदी तुफान; वाळपई फोंडा मार्ग बंद

काल पासून कोसळणाऱ्या पावसामुळे गोव्यातील (Goa) बहूतेक नद्यांना पूर (Flood the rivers) आला आहे.
Goa: म्हादई व रगाडा नदी तुफान; वाळपई फोंडा मार्ग बंद
Mandovi and Ragada river stormsDainik Gomantak

गुळेली - काल पासून कोसळणाऱ्या पावसामुळे गोव्यातील (Goa) बहूतेक नद्यांना पूर (Flood the rivers) आला आहे. म्हादई (Mandovi River) व रगाडा नदी तुफान झाली असून रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आज दिवसभर जरा सुध्दा उसंत न घेता कोसळणाऱ्या पावसामुळे (Heavy Rain) सत्तरीतील जनजीवन विस्कळित झाले आहे.म्हादई नदी पूर्ण भरुन वाहत असून नदीलगतच्या बागायतीत पाणी शिरल्यामुळे बायायतदारांना नुकसानिस सामोरे जावे लागणार आहे.(Mandovi and Ragada river storms; valpoi ponda route closed)

रगाडा नदीही पूर्ण भरुन वाहत आहे या नदिचे पाणी वाढल्यामुळे गुळेलीहून मेळावली भागाचा संपर्क तुटला असून म्हारवाड ते मुरमुणे पर्यंतचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. म्हादई नदीचे पाणी वाढल्यामुळे कणकिरे ,गांजे या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे रस्ता पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली आहे.

Mandovi and Ragada river storms
Goa: बलात्कार प्रकरणातील संशयितला उत्तरप्रदेशहून अटक

संध्याकाळी पाच च्या दरम्यान नदिचे पाणी वाढायला सुरुवात झाली आणि नंतर रस्ते पुर्णपणे बंद झाल्याने मडगाव फोंडा कुंडई आदी भागात गेलेले नागरिक पाणी भरल्यामुळे अडकून पडले आहेत. पावसाचा जोर असाच राहिला तर उद्या सुद्धा रस्ता खुला होणार नाही अशी चिन्हे दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com