मांद्रे प्रभागातर्फे सुरेश रैना मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!

भारतीय युवा मोर्चेने केलेल्या चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे मांद्रे प्रभागातर्फे आयोजन.
मांद्रे प्रभागातर्फे सुरेश रैना मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन!
Organizing competitions Dainik Gomantak

भारतीय युवा मोर्चाच्या मांद्रे (Mandrem) प्रभागातर्फे आयोजित केलेल्या मांद्रे मतदारसंघ चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे मांद्रे प्रभागातर्फे आयोजन (Organizing competitions) शुक्रवारी तुये येथील सुरेश रैना मैदानावर सती 11 आणि यशोदीं 11 पार्से यांच्यात झाला. स्पर्धेत एकूण 40 संघानी भाग घेतला असून अंतिम सामने रविवार 14 रोजी होणार आहेत.

Organizing competitions
गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार; आमदार दयानंद सोपटे!

या स्पर्धेचे उद्घाटन तुये पंचायतीचे सरपंच सुहास नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी कोरगावच्या श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक विठोबा बगळी , साईनंद दयानंद सोपटे, साईदीप दयानंद सोपटे, भारतीय युवा मोर्चा मांद्रेचे अध्यक्ष रामा नाईक,सदस्य विठु शेटगावकर ,सचिन गडेकर जयराम नाईक आदी उपस्थित होते.ही स्पर्धा 4 षटकांची असून दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे या स्पर्धेत अंतिम विजेता ठरणारा संघ उत्तर गोवा पातळीवर होणाऱ्या मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे.

तुये येथील सुरेश रैना मैदानावर भारतीय युवा मोर्चाच्या मांद्रे प्रभाग तर्फे आयोजित मांद्रे मतदार संघ मर्यादित मुख्यमंत्री चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे श्रीफळ देऊन उद्घाटन करताना तुये सरपंच सुहास नाईक ,बाजूला विठोबा बगळी, साईनंद सोपंटे, साईदीप सोपटे, रामा नाईक, सचिन गडेकर, विठु शेट गावकर व इतर.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com