मांद्रे मतदार संघातील जागा कॉंग्रेसला की गोवा फॉरवर्डला?

कॉंग्रेसचे 23 आमदार स्वबळावर निवडून येतील, कॉंग्रेसला विश्वास
Mandrem constituency
Mandrem constituencyDainik gomantak

मोरजी : कॉंग्रेस पक्षाने गोवा फोरवर्ड पक्षाकडे युती केल्यामुळे मांद्रे मतदार संघातील जागा कॉंग्रेसला की गोवा फॉरवर्ड अशी चर्चा चालू असतानाच आज कॉंग्रेसने, केरी येथील श्री आजोबा देवाला श्रीफळ ठेवून प्रचाराला सुरुवात केली. त्यावेळी सर्व संभाव्य उमेदवारांनी जरी उमेदवारी कुणालाही मिळाली तरीही त्या उमेदवाराच्या मागे राहून कॉंगेसला विजयी करण्याचा निर्धार केला.

कॉंग्रेसची उमेदवारी मिळवण्यासाठी युवा नेते सचिन परब, जिल्हा  सदस्य सतीश शेटगावकर आणि माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप हे इच्छुक आहेत. या उमेदवारांनी संयुक्तरित्या संघटीत होवून प्रचाराला सुरुवात केली. त्यावेळी माजी मंत्री संगीता परब, कॉंग्रेस गट अध्यक्ष नारायण रेडकर, महिला अध्यक्ष रेखा परब, काना उर्फ लक्ष्मिकान्त शेटगावकर, माजी सरपंच गुरुदास पांडे, सेवा दल अध्यक्ष अरुण  वस्त व नागरिक समर्थक, महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

Mandrem constituency
निर्बंधांमुळे भाजपचा घरोघरी जाऊन प्रचार; विरोधी पक्षांची रणनीती काय?

कॉंग्रेसचे (Congress) युवा नेते सचिन परब यांनी बोलताना आजच्या दिनी सर्व समर्थकांच्या सहकार्याने आणि पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार प्रचाराला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी ही जागा दुसऱ्या युतीच्या पक्षाला मिळेल अशी चर्चा होती. मात्र ही जागा कॉंग्रेस पक्षाला मिळणार असून पक्षाने आपला प्रचार सुरु केला आहे. उमेदवारीही लवकरच जाहीर होईल असे सांगून कुणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही संघटीत होवून पक्षासाठी काम करून, कॉंग्रेसचा आमदार (MLA) निवडून आणणार असा विश्वास व्यक्त केला. आम्ही देवाकडे जसे नतमस्तक होतो तसेच मतदार राजासमोर नतमस्तक होवून आमदार कॉंग्रेसचा विजयी करण्यासाठी प्रतिज्ञा घेवूया असे सांगितले.

कॉंग्रेस सरकार (government) सत्येवर यायचे आहेत आणि आणायचे आहे ती बेरोजगार युवकांची कामे करण्यासाठी असे सचिन परब म्हणाले. लोकांची कामे व्हायला हवी. येणारा काळ हा कॉंग्रेसचा काळ असेल असे सांगून कॉंग्रेसचे 23 आमदार स्वबळावर निवडून येतील असे सचिन यांनी सांगतले.

माजी मंत्री संगीता परब यांनी बोलताना ही प्रचार मोहीम चालू असताना नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे की, मागच्या 10 वर्षात भाजपने कशी वाट लावली तीजाणून घेवूया. विकासाची 10 वर्षे म्हणून स्वतःची पाठ थोपटून मुख्यमंत्री (CM) सहित सर्व मंत्री आमदार घेतात, हे सरकार घोटाळ्याचे सरकार म्हणून नावारूपास आले आहे. राज्यपालांनी सरकारच्या सांगण्यावरून भेट नाकारली. पोलिसांची दमदाटी लोकांनी पाहिली, जनतेची अफाट शक्ती आता निवडणुकीतून (elections) दिसून येईल यापुढे भाजपाचे (BJP) सरकार नको, अनैतिक मार्गातून हे सरकारस्थापन झाले आहे. त्याला हाकलून देवूया असे माजी मंत्री संगीता परब यांनी सांगितले.

Mandrem constituency
माझ्या निवृत्तीच्या चर्चा निराधार : प्रतापसिंग राणे

जिल्हा सदस्य सतीश शेटगावकर यांनी बोलताना कॉंग्रेस पक्षाचेच आता सरकार येणार आहे, कॉंग्रेस पक्ष संपलेला नाही, जे कॉंग्रेस मधून दुसऱ्या पक्षात जावून सरकार घडवले ते संपणार आहे. असे सतीश शेटगावकर यांनी सांगितले.

माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी बोलताना कॉंग्रेसच्या विजयाची मोहीम आता मान्द्रेमधून फत्ते होणार आहे, हितासाठी नागरिक कार्यरत आहे त्यांना परमेश्वराचा आशीर्वाद आहे. संबध गोव्यात काँग्रेसमय वातावरण आहे त्याचा आम्ही फायदा घेण्याचे आवाहन केले. देशभरात वातावरण आहे, आगामी कॉंग्रेस सरकार येईल. ही विजयाची यात्रा काणकोण पर्यत पोचणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी कॉंग्रेस गट अध्यक्ष नारायण रेडकर आणि महिला अध्यक्षा रेखा परब यांनी कॉंग्रेस पक्षाच्या विजयासाठी ज्याना उमेदवारी मिळेल त्यांच्यासाठी संघटीत होवून काम करुया असे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com