मंंगेशीचे मंदिर १७ ऑक्टोबरपासून खुले

अवित बगळे
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

गोव्यातील प्रसिद्ध देवालय असलेल्या मंगेशी येथील श्री मंगेश देवाचे मुखदर्शन १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. कोविड टाळेबंदी आणि त्यानंतरही देवालय भाविकांसाठी सध्या बंद आहे.

पणजी

गोव्यातील प्रसिद्ध असे मंगेशी येथील श्री मंगेशाचे मुखदर्शन येत्या १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. श्री मंगेशाला कौल लावून विचारणा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थान समितीने ही माहिती दिली आहे. देवस्थान समितीने दिलेल्या माहितीनुसार देवस्थान समिती व पुजाऱ्यांनी देवाकडेच मंदिर कधी खुले करावे याविषयी कौलाद्वारे विचारणा केली असता तातडीने मंदिर खुले करण्यास देवाने कौल दिला नाही. तथापि येत्या १७ ऑक्टोबर रोजी असलेल्या घटस्थापनेच्या दिवसापासून देवाचे मुखदर्शन सुरु केले जाणार आहे. दुपारी तीन ते सायंकाळी सहा यावेळेतच मुखदर्शन करता येणार आहे. धुळभेट घेता येणार नाही. याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे देवस्थानकडून कळवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या