Mango & Cashew Season: लहरी हवामानामुळे आंबा-काजू बागायतदार चिंतेत

राज्यात ढगाळ हवामान असून या बदलत्या वातावरणाचा आंबा काजू बागायतदारांना सामना करावा लागत आहे.
Mango & Cashew Season
Mango & Cashew SeasonDainik Gomantak

गोव्यासह लगतच्या सिंधुदुर्गात आंबा काजूच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. यंदा थंडी बऱ्यापैकी पडल्याने भरघोस उत्पादन मिळण्याचा बायतदारांचा अंदाज होता. मात्र गेले 2-3 दिवस राज्यात ढगाळ हवामान असून या बदलत्या वातावरणाचा आंबा काजू बागायतदारांना सामना करावा लागत आहे. (Impact Of Weather On Mango & Cashew Season)

काल आणि आज राज्यात ढगाळ हवामान होते. आंबा काजू झाडाला मोहोर आल्यानंतर ढगाळ हवामान निर्माण झाल्याने फळधारणा कमी प्रमाणात होते. तसेच आलेला मोहोर करपण्याचीही दाट शक्यता असते. परिणामी हातातोंडाशी आलेलं पीक खराब होऊन नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होतेय.

Mango & Cashew Season
Car Accident : मंगेशी जंक्शन येथे दोन कारमध्ये अपघात, 5 जण जखमी

ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि काजू पिकांची मोहर प्रक्रिया पुढे जाण्याची शक्यता आहे. अजून काही दिवस हे वातावरण असेच राहिले तर यावर्षी फवारणीसह मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील वर्षीही अवकाळी आणि बदलत्या हवामानामुळे काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र दिसत होते. मात्र यंदा तरी भरघोस पीक हाती यावं हीच बागायतदारांची इच्छा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com