शिवाजी महाराज मैदानाजवळील आम्रवृक्ष बनलाय कमकुवत

प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ रस्त्याच्या बाजूने उभा असलेला आम्रवृक्ष कमकुवत बनला असून या वृक्षामुळे एखादेवेळी विपरीत घटना घडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

डिचोली: शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ रस्त्याच्या बाजूने उभा असलेला आम्रवृक्ष कमकुवत बनला असून या वृक्षामुळे एखादेवेळी विपरीत घटना घडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तशी भीतीही शहरात वर्तविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदानाला टेकूनच असलेल्या या आंब्याच्या जुनाट झाडाच्या फांद्या पूर्णपणे सुकल्याचे दिसून येत आहे. 

मागील हंगामात या आंब्याला फळधारणा झालेली होती. मात्र, अलीकडेच या झाडाच्या बहुतेक फांद्या सुकल्याचे आढळून येत आहे. गडगडाटावेळी या झाडावर वीज कोसळली असावी आणि त्यातूनच भर पावसात या आम्रवृक्षाच्या फांद्या सुकल्या असाव्यात. असा अंदाज काही नागरिक बांधत आहेत. मुख्य रस्त्यावरच हा आम्रवृक्ष उभा असून, त्याठिकाणी रहदारी चालूच असते. एखादेवळी सुकलेली फांदी कोसळल्यास अनर्थ घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. संभाव्य धोक्‍याची संबंधितांनी वेळीच याची दखल घेवून, या झाडाच्या सुकलेल्या फांद्या तोडाव्यात. अशी मागणी जागृत नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या