पावसामुळे उतरला गोव्यातील 'मानकुराद'चा भाव

ग्राहकांची मनमुराद खरेदी: आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका
पावसामुळे उतरला गोव्यातील 'मानकुराद'चा भाव
Mango prices fall in Goa due to rainsDainik Gomantak

पणजी: आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी पावसाला घाबरून आंबा पिकण्याअगोदर काढून घेतल्याने बाजारात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मानकुरादसारख्या आंब्याचेही दर उतरले. साधारण दर्जाचा मानकुराद आंबा सरासरी 300 रुपयांपर्यंत मिळत आहे. दरम्यान, भाव कमी झाल्याने ग्राहक मात्र मानकुराद आंब्याची मनमुराद खरेदी करत आहेत.

सध्या पणजी, मडगाव इतर छोट्या मार्केटमध्ये मानकुराद आंबा मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यातच मानकुरादला टिकून राहण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. या मोठ्या पुरवठ्यामुळे विक्रेत्यांना मिळेल त्या किमती आंबा विकावा लागत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असला तरी ग्राहक खवय्यांना मात्र यंदा कमी किमतीत मानकुरादची चव चाखायला मिळत असल्याने समाधान व्यक्त करीत आहेत.

Mango prices fall in Goa due to rains
गोव्यातील रेल्वे दुहेरीकरणावर आज ‘सर्वोच्च न्यायालयात’ सुनावणी

कृषी खात्याचे संचालक नेविल आल्फान्सो म्हणाले, ‘गेल्या हंगामातील कडक उष्णता आणि अनियमित पाऊस यामुळे यंदा मानकुरादचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. सध्या पावसाचे वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी आलेला आंबा पीक काढले आहे. आता ते बाजारात एकाचवेळी येत आहे. हापूसच्या तुलनेत मानकुरादला टिकून राहण्याची क्षमता अत्यल्प आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याच्या नियमानुसार किंमती झपाट्याने कमी झाल्या आहेत.’‘कॅनिंग’ उद्योगाचा अभाव बहुतांशी फळ उद्योगांमध्ये जोड व्यवसायाची अत्यंत गरज असते. कोकणात हापूसच्या बाबतीत ते घडते. हापूस पिकवून खाण्यापेक्षा त्याचा रस आणि गर काढून (कॅनिंग किंवा पल्प) मोठ्या प्रमाणात तो साठवला जातो. त्यामुळे आंब्याचे दर उतरत नाहीत आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. गोव्यात असा कॅनिंगचा व्यवसाय अजूनपर्यंत उभारलेला नाही. साहजिकच त्याचा परिणाम आंबा व्यवसायाला होतो.

यामुळे दर गडगडले

मागील हंगामात लांबलेला पाऊस, कडक उष्णता यामुळे मानकुराद आंब्याचा मोहर उशिरा व एकदम आला. पण, मोठ्या प्रमाणात आलेला मोहर गळून पडला. त्यामुळे यंदाचे आंब्याचे पीक निम्म्यावरआले. अशातच शेतकऱ्यांनी पावसाला घाबरून आंबा पिकण्याअगोदर काढून घेतले. त्यामुळे मागणी पुरवठ्यावर परिणाम होऊन आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात आला. परिणामी मानकुरादचे दर गडगडले. व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com