
Manohar International Airport At Mopa: दाबोळीनंतर गोव्यात मोपा येथे नवीन विमानतळ कार्यान्वित करण्यात आले आहे. 11 डिसेंबर 2022 रोजी या विमानतळाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर 05 जानेवारी 2023 रोजी या विमानतळावरून पहिले उड्डाण झाले.
विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून आत्तापर्यंत विमानतळ जोमात सुरू असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मागील 77 दिवसांत मनोहर विमानतळावरून तब्बल सहा लाख प्रवाशांनी ये - जा केली आहे. तर, टॅक्सीच्या देखील दररोज हाजारो फेऱ्या होत आहेत, अशी माहिती समोर आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर विमानतळावर दररोज 36 विमानांची ये -जा होत आहे. मागील 77 दिवसांत विमानतळावर सहा लाख प्रवासी आले असून, टॅक्सी व्यवसायिक देखील जोमात आहेत. मनोहर विमानतळावरून दिवासाला टॅक्सीच्या साडेचार हजार (4,500) फेऱ्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
आकडेवारी पाहता मोपा विमानतळ (Mopa Airport) सुरू झाल्यापासून गोव्यात येण्यासाठी विमानाने प्रवास करण्याला पसंती दिली जात असल्याचे दिसून येते. शिवाय विमानतळासह टॅक्सी व्यवसायिकांची देखील भरभराट झाल्याचे दिसून येत आहे.
दाबोळीही सुसाट
मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दाबोळीवर विपरीत परिणाम होईल; विमानांचे प्रमाण कमी होऊन आहेत ती मोपाकडे सरकतील, ही भीती अनाठायी ठरली आहे.
मोपा सुरू झाल्यानंतरही दाबोळी विमानतळावर सध्या दिवसाकाठी 80 पेक्षा जादा विमाने उतरत असून, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या विमानांची संख्या 24 आहे. गेल्या वर्षी अपवादात्मकदृष्ट्या ‘ऑफ सिजन’मध्येही दाबोळीवर दिवसाकाठी 100 पेक्षा अधिक विमाने उतरत होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.