मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‍घाटन

दैनिक गोमन्तक
रविवार, 13 डिसेंबर 2020

मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या सभागृहात मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले

पणजी: मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या सभागृहात मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्याचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.

यावेळी ‘मनोहर पर्रीकर, बुद्धीजीवी व सामान्य हास्य’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. पत्रकार निखील गोखले यांनी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. माजी मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा दृष्टीकोन विज्ञान, तंत्रज्ञान व नाविन्य यामध्ये होता.

त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात आवड निर्माण करण्यासाठी हा महोत्सव गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे. या महोत्सवात या क्षेत्रात तज्ज्ञ व संशोधक यांच्यामार्फत माहिती देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी या उद्‍घाटनपर भाषणात बोलताना मत व्यक्त केले.

आणखी वाचा:

प्रमोद सावंत यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली -

संबंधित बातम्या