Manoj Parab : मनोज परबांना म्हादईवरुन पत्रकारांनी घेरलं, पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?

म्हादईसाठी पत्रकार परिषद घेतली तर फक्त त्यावरच बोला असा आग्रह पत्रकारांनी धरला.
Manoj Parab
Manoj ParabDainik Gomantak

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी आज पणजीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज परबांनी भाजप सरकारला चांगलंच धारेवर धरलं. जिथे केंद्रीय गृहमंत्री गोव्याच्या शिष्टमंडळाला 15 मिनिटंही देत नाहीत तिथे म्हादईचा प्रश्न मुख्यमंत्री प्रमोद सावंत कसा सोडवणार असा सवाल मनोज परबांनी विचारला. मात्र याच पत्रकार परिषदेत मनोज परबांना पत्रकारांनी घेरत प्रश्नांची सरबत्ती केली. म्हादईसाठी पत्रकार परिषद घेतली तर फक्त त्यावरच बोला असा आग्रह पत्रकारांनी धरला.

पत्रकारांनी मनोज परब यांना म्हादईप्रश्नी जर लढा द्यायचा असल्यास सर्व विरोधकांनी एकत्र यावं असं सांगताच मनोज परबांनी याला सपशेल नकार दिला. जे पक्ष राष्ट्रीय पातळीवर कर्नाटकच्या बाजूने बोलतात त्यांच्यासोबत जाणार नाही अशी भूमिका परबांनी घेतली. यावर पत्रकारांनी कर्नाटकचं जाऊद्या आता गोव्याचं बोला आणि एकत्र व्हा असं म्हणत मनोज परबांची चांगलीच कोंडी केली.

Manoj Parab
Mahadayi Water Dispute : अमित शहांनी गोव्याला फक्त 15 मिनिटं दिली; म्हादईप्रश्नी मनोज परबांनी सरकारला घेरलं

म्हादईसाठी पत्रकार परिषद घेतली असताना मनोज परबांनी सरकारवर विविध मुद्दे मांडत टीका केली. यावरुनही पत्रकारांनी परबांना घेरलं. जर पत्रकार परिषद म्हादईवर बोलण्यासाठी घेतली असेल तर म्हादईवर बोला, बाकीचे मुद्दे आता महत्वाचे आहेत का असा सवाल पत्रकारांनी विचारला. यावर म्हादई हा मुद्दा रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने उचलून धरला आहे, त्यासाठी आपल्या वचननाम्यातही गोव्यातील जनतेला आश्वासन दिल्याचं परब म्हणाले.

दरम्यान गोव्यात सध्या म्हादईचा प्रश्न पेटला आहे. विरोधकांनी सातत्याने सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. अशातच रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी गोवा सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. गोवा सरकारमधील मंत्र्यांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेले होते. मात्र केवळ 15 मिनिटात ही भेट आटोपती घेत केंद्राकडून गोव्यातील भाजप नेत्यांची बोळवण केल्याचा टोला मनोज परब यांनी लगावला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com