Goa Political News: फुटिरांच्‍या दारात जाऊन बसणार! मनोज परबांचे विधान

राज्यात नुकत्‍याच घडलेल्‍या ‘घाऊक’ पक्षांतरामुळे मतदारांमध्‍ये संताप आणि चीड व्‍यक्त होत आहे.
Manoj Parab And Giriraj Pai Vernekar
Manoj Parab And Giriraj Pai VernekarDainik Gomantak

राज्यात नुकत्‍याच घडलेल्‍या ‘घाऊक’ पक्षांतरामुळे मतदारांमध्‍ये संताप आणि चीड व्‍यक्त होत आहे. यावेळी फुटीरांनी देवाला देखील सोडले नाही. आता गोमंतकीय जनतेने जागृत होण्याची वेळ आली आहे, कारण लोकांचा वारंवार विश्‍वासघात होत आहे. त्या आठ फुटीर आमदारांना आम्ही स्वस्त बसू देणार नाही. त्यांच्या घरी जाऊन दारात बसणार, असा इशारा रिव्होल्‍युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजी) प्रमुख (Head of the Revolutionary Gowans Party RG Manoj Prab) मनोज परब यांनी दिला. तर, संविधान अमान्य असलेल्या पक्षाला संविधानिकरित्या घडलेल्या घटनेबद्दल जाब विचारण्याचा नैतिक अधिकार नाही, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी दिले.

गोमन्‍तक टीव्‍हीच्‍या ‘सडेतोड नायक’ क्रार्यक्रमात पक्षांतर आणि गोव्याच्या राजकारणाशी निगडित चर्चेत ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी केले. पक्षांतराच्या राजकारणामुळे गोमंतकीय जनता हताश आणि निराश झाल्याचे आज दिसून येत आहे. त्यात विधिमंडळ गटात दोन तृतीयांश फूट पाडून तो गट दुसऱ्या पक्षात विलीन करण्याच्या घटना घडत आहेत.

Manoj Parab And Giriraj Pai Vernekar
Goa Congress : काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी युरी आलेमाव यांची नियुक्ती

सध्या हा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. त्‍यावर बोलताना पै वेर्णेकर म्हणाले की, पक्षांतराची घडलेली घटना भारतीय संविधानानुसार आहे. आमदार दोन तृतीयांश असल्याने हे पक्षांतर कायद्याप्रमाणे आहे. परंतु मनोज परब यांनी भाजपवर हल्ला चढविताना सांगितले की, ज्या आठ आमदारांनी श्री महालक्ष्मी, बांबोळीतील फुलांचो क्रॉस तसेच बेती येथील दर्ग्यात जाऊन पक्षांतर न करण्याची शपथ घेतली होती, त्यांनी आज देवापुढे खोटारडेपणा केल्याचे उघड झाले आहे.

देशात हिंदुत्वाचा आधार घेऊन राजकारण करणाऱ्या भाजपने आता तर देवाची फसवणूक करणाऱ्यांचे पक्षात स्वागत करून कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहण्याचे धोरण स्पष्ट केले आहे. लोकशाहीची तत्त्वे पायदळी तुडविली जात असून ते कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न नायक यांनी दोघांच्या पुढे ठेवला. देवाच्या पुढे जाऊन शपथ घेणे हा प्रश्‍न परिस्‍थितीवर अवलंबून आहे. पक्ष सत्तेत आल्यास ही शपथ लागू होते, परंतु येथे परिस्थिती वेगळी आहे.

Manoj Parab And Giriraj Pai Vernekar
Goa Congress Rebel : दीर्घ प्रतिक्षेनंतर काँग्रेसमधील बंडखोरांची अमित शहा, नड्डांसोबत चर्चा

निवडणुकीत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. तसेच पक्षांतराची कीड ही 1963 पासूनच गोव्यातील राजकारणाला लागली आहे, असे गिरिराज पै वेर्णेकर यांनी सांगितले. तर, परब म्‍हणाले, गोमंतकीय जनता आपल्या हक्काचा पुरेसा वापर करत नाहीय. पक्षांतर करण्याच्या घटनांमध्ये हल्ली वाढ झाली आहे. तरी देखील त्याच नेत्यांना पुन्हा निवडून दिले जात आहे. हे रोखणे काळाची गरज आहे.

राज्यातील एकाही राजकीय पक्षाचे धोरण खाण आणि पर्यटन उद्योगाबाबत स्‍पष्‍ट नाही, असे नायक म्‍हणाले. त्‍यावर पै वेर्णेकर म्‍हणाले की, गोव्यात आज कोणताही प्रकल्प आल्यास त्यास विरोध करण्याचा ट्रेंड सुरू आहे. नावशी येथील मरिना प्रकल्प असो किंवा सांगे येथील आयआयटी प्रकल्प. सामाजिक कार्यकर्त्यांकडून आपला वैयक्तिक स्वार्थ साधला जात आहे. त्‍यावर पलटवार करताना परब म्‍हणाले की, ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवर आज भाजप आरोप करत आहे, त्यांच्या पाठीवर स्वार होऊन हा पक्ष सत्तेत पोहोचला आहे.

Manoj Parab And Giriraj Pai Vernekar
Goa Congress : काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी युरी आलेमाव यांची नियुक्ती

केंद्रात देखील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन झाले तेव्हा याचा लाभ कोणाला झाला हे सगळ्यांना ठाऊक आहे. तसेच निवडणुकीत विजयी झाले म्हणून बळजबरीने प्रकल्प लादता येणार नाहीत, असेही ते म्‍हणाले.

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांतून नेते आयात केल्यानंतर भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. आपल्‍याकडे पक्षांतराचा प्रस्ताव आला असता तर आपण तो नाकारणार होतो, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्‍हटले होते. त्‍यांचे ते वक्तव्‍य राजू नायक यांनी पै वेर्णेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. त्‍यावर ते म्‍हणाले, काँग्रेस पक्ष वारंवार फुटत आहे. त्‍यास तेच जबाबदार आहेत. काँग्रेसच्‍या आमदारांना भाजपमध्‍ये घेण्याचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींकडून आला होता आणि प्रदेशाध्यक्षांनी तो मान्य केला आहे.

Manoj Parab And Giriraj Pai Vernekar
Madgaon Mayor : घनःश्याम शिरोडकर यांच्यावर अग्निपरीक्षेची वेळ

मनोज परब, ‘आरजी’चे प्रमुख: ज्या आठ आमदारांनी देवापुढे पक्षांतर न करण्याची शपथ घेतली होती, त्यांनीच आज देवापुढे खोटारडेपणा केल्याचे उघड झाले आहे. देशात हिंदुत्वाचा आधार घेऊन राजकारण करणाऱ्या भाजपने आता तर देवाची फसवणूक करणाऱ्यांचे पक्षात स्वागत करून कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहण्याचे धोरण स्पष्ट केले आहे.

गिरिराज पै वेर्णेकर, भाजपचे प्रवक्ते: देवापुढे जाऊन शपथ घेणे हा प्रश्‍न त्‍या वेळच्‍या परिस्‍थितीवर अवलंबून आहे. पक्ष सत्तेत आल्यास ही शपथ लागू होते, परंतु येथे परिस्थिती वेगळी आहे. निवडणुकीत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. तसेच पक्षांतराची कीड 1963 पासूनच गोव्यातील राजकारणाला लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com