Goa BJP : लालसेपोटी अनेकांनी भाजप सोडला ; सदानंद शेट तानावडे

मात्र आज स्‍थिती बिकट; ‘सिली सोल्स’वर मौन
BJP state president Sadanand Shet Tanawade
BJP state president Sadanand Shet Tanawade Dainik Gomantak

म्हापसा : मध्यंतरी विधानसभा निवडणूकपूर्वी अनेकांना स्वप्ने पडू लागली की, भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकणार नाही. त्यामुळे काहींनी पक्ष सोडला. त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्रिपद किंवा इतर मोठे पद मिळण्याच्या लालसेपोटी त्यांनी भाजप सोडला.

मात्र, आज हीच मंडळी धडपडताना दिसताहेत, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. दरम्‍यान, सध्याचे वादग्रस्त ‘सिली सोल्स कॅफे अँड बार’वर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यास तानावडे यांनी नकार दिला.

याबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपली बाजू मांडली आहे. शिवाय हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मला यावर काहीच भाष्य करायचे नाही, असे ते म्हणाले.

BJP state president Sadanand Shet Tanawade
CM Pramod Sawant : सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सप्टेंबरमध्ये चिंतन शिबिर

आज सायंकाळी उशिरा म्हापशात भाजपच्या एका कार्यक्रमानंतर तानावडे माध्यमांशी बोलत होते. विधानसभा निवडणूकपूर्वी अनेकांना वाटायचे की भाजपला फक्त 10 ते 12 जागा मिळतील. त्यामुळे अनेकांनी या पक्षाला सोडचिठ्ठी देण्‍याचा निर्णय घेतला.

काँग्रेस सत्तेवर येणार या आशेने ते तिथे गेले, जेणेकरुन मुख्यमंत्री बनण्याची त्यांना संधी भेटेल. मात्र, तसे काही झालेच नाही. अशावेळी, आज या लोकांना नक्कीच पश्चाताप होत असेल, असे तानावडे म्‍हणाले.

मुळात लोकांचा भाजपवर विश्वास असल्याने आम्ही हॅट्‌ट्रिक साधत तिसऱ्यांदा सत्तेवर आलो. आम्ही निवडणूकपूर्वी 22 पेक्षा जास्त मतदारसंघ जिंकू असे म्हटले होते. पण दोन ठिकाणी मोजक्या अंतराने आम्ही मागे राहिलो. तरीही, भाजपचे बहुमताचे सरकार स्थापित झाले, यावर तानावडे यांनी जोर दिला.

पक्षात कुणाला घ्यावे आणि कुणाला नको, हा निर्णय केंद्रीय पातळीवर होतो. कारण, भाजप हा प्रादेशिक पक्ष नाही. मुळात माझ्याकडे कुठल्याच काँग्रेसच्या आमदाराने यासंदर्भात संपर्क साधलेला नाही. मात्र, काँग्रेसमध्ये असंतोष असल्याचे जाणवते.

मध्यंतरी, विधानसभा अधिवेशनावेळी काँग्रेसच्या आमदारांची तोंडे हे एकमेकांविरोधात असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. परंतु, माझे कुणाकडेच याविषयी भाष्य झाले नसल्याचे स्पष्टीकरण तानावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिले.

भाजपमध्‍ये साध्‍या कार्यकर्त्यालाही मान

1. घराणेशाहीवर बोलताना सदानंद शेट तानावडे म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले होते की भाजपचे नेतृत्व हे पक्षातील सर्वसामान्य व्यक्ती करू शकते. आज नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. विशेष म्‍हणजे त्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती. ते स्वतःच्या कार्यावर व कर्तृत्वावर पंतप्रधान बनले.

2. माझ्या घरात कुणीच राजकारणात नव्हते. तरीही मी आमदार बनलो व आज भाजप प्रदेशाध्यक्ष आहे. शिवाय डॉ. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री बनले. दुसऱ्या बाजूने काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, लालूप्रसाद यादव, मुलायम सिंह यांच्या पक्षात घराणेशाहीच पाहायला मिळते. पण भाजप त्‍यास अपवाद आहे, हेच आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com